मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड- भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका यांच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाच्या निमित्ताने 13 वे पुष्प रविवार दिनांक 21.9.25 रोजी दौंड येथे आयु. श्रीकांत साळवे दौंड तालुका संघटक यांचे निवासस्थानी संपन्न झाले या कार्यक्रमासाठी कालाम सूत्त अर्थात मानव मुक्तीचा जाहीरनामा या विषयावर आयु. बी जी घाटे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व चे अध्यक्ष यांनी प्रवचन दिले प्रास्ताविक आयू. राजेंद्र कांबळे संस्कार उपाध्यक्ष यांनी केले शुभेच्छा गौतम भालेराव कोषाध्यक्ष, कैलास हरीभाऊ जगताप संस्कार सचिव, कैलास डाळिंबे पुणे जिल्हा पूर्व चे संघटक, बाळू मोरे संरक्षक उपाध्यक्ष यांनी केले सूत्रसंचालन आयु. डी एल कोकाटे सरचिटणीस यांनी केले हा कार्यक्रम आयु.दादा बाळू मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला आयु. श्रीकांत साळवे यांनी आभार व्यक्त केले या प्रसंगी नागसेन धेंडे, जयदीप बगाडे पत्रकार, श्रीकांत शिंदे, श्रीधर बालकुंद्री पुणे जिल्हा संघटक, मच्छिंद्र डेंगळे, राजेश मंथने, मंथने मॅडम, सचिन पाटोळे, संजय सोनवणे, जगदीश शिदगणे, रितेश सोनवणे, मंगेश मैलार, दीपक चितारे, विकास पानसरे, मोझेस राठोड आणि श्रद्धा संपन्न उपासक आणि उपासिका उपस्थित होते

