मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड ( पिंपरी चिंचवड )
पिंपरी, दि.06 डिसेंबर ; भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दि.6 डिसेंबर रोजी पिंपरी चौकातील भींमसृष्टी परिसरातील त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार व पुष्पगुच्छ अर्पण करून व दीपप्रज्वलित करून हजारो भीम अनुयायी कडून अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड शहर व परिसरातील सर्व पक्ष व सामाजिक संघटना चे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व त्यांच्याकडून अतिशय शांतपणे व कोरोना नियमांचे पालन करत अभिवादन करण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने भीम अनुयायी व भीमसैनिक उपस्थित होते. तसेच भीमसृष्टी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावरील व त्यांनी लिहिलेले अनेक पुस्तकं विक्री साठी ठेवलेले दिसून आले.

