मूकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धन.
उत्तूर, दि.०७: दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा शाखा कोल्हापूर दक्षिण समता सैनिक दल मिलिंदनगर स्पोर्ट्स असोसिएशन उत्तूर, तालुका आजरा यांचे संयुक्त विद्यमानेवर्षावासातील भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने धम्म प्रवचनाचे आज सकाळी ११:० वाजता आयु. प्रा. विलास कांबळे सर यांचे घरी आयोजन केले होते, बौद्धांची आचारसंहिताह्या केंद्र संस्थेच्या विषयाशयावर प्रवचनकार योगेश्वरी कल्याणी तानाजी राजवर्धन या उपासिकानें विषय प्रभाविपणे मांडला.
तत्पूर्वी जेष्ठ नागरिक आयु. कामत गुरुजी, कामतताई, आयु. प्रा. विलास कांबळे, प्रमोद कांबळे, सतिश कांबळे यांचे हस्ते पावन पवित्र तथागत सम्यक संबुद्ध, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर प्रतिमांना सफेद फुले, पुष्पहार अर्पण करुन मेणबत्ती, सुगंधित अगरबत्ती नें पंचांग प्रणाम, त्रिसरण, पंचशील, बुद्ध वंदना ई. गाथा पठणानें वंदन करण्यात आले.
आपल्या प्रस्तावनेत संस्थेचे बौद्धाचार्य आयु. सुशीलकुमार प्रज्ञावंत यांनी वर्षावासातील भाद्रपद पौर्णिमेच्या कार्यक्रमाची रूपरेषा प्रस्तावित केली… आजरा तालुका अध्यक्ष आयु. जीवन शेवाळे यांनी वर्षावासाचे महत्व समजावून सांगितले.
प्रमुख अतिथी धम्म वक्ते, मा.डेप्युटी इंजिनिअर, संस्थेचे कोल्हापूर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आयु. एस. व्ही. ऐनिकर यांनी आजरा तालुक्यातील धम्म चळवळीबद्दल कौतुक करुन उत्तूर येथील आयु. प्रा. विलास कांबळे सर आणि मिलिंदनगर स्पोर्ट्स असोसिएशन यांचे जबाबदार सुनियोजनाबद्दल अभिनंदन केले आणि आगामी सुट्टीच्या दिवसांत, दर रविवारी बाल धम्मसंस्कार शिबीर, महिला धम्म संस्कार शिबीर, समता सैनिक शिबीर आयोजित करणेबाबत आवाहन केले.
या वर्षावासातील भाद्रपद पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित धम्म प्रवचनाला मिलिंदनगर स्पोर्ट्सचे सर्व उपासक, उपासिका यांनी मोलाचे सहकार्य केले..सर्वच आंबेडकरवादी चळवळीतील उपासक उपासिका, नेते कार्यकर्ते, बंधू भगिनी यांनी जास्तीतजास्त उपस्थिती दर्शविली होती.सामुदायिक सरणतय गाथा पठणाने या वर्षावास भाद्रपद पौर्णिमेच्या धम्म प्रवचन कार्यक्रम चा समारोप करण्यात आला.

