Thursday, February 26, 2026
Homeनागपूरसंविधानाची ताकत

संविधानाची ताकत

“जय भीम” नावाचा एक उत्कृष्ट तमिळ डब चित्रपट हिंदीमध्ये या दिवाळीत आपल्याला पाहायला मिळाला . भारत देश स्वतंत्र होऊन इतकी वर्षे झाली तरी तळागळातील  वंचित ,आदिवासी समुदायावर सवर्ण किती अन्याय करत आहेत ह्याची उत्कृष्ट कलाकृती आपल्याला ह्या चित्रपटात पाहायला मिळते . संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या जीवावर कसा निरपराध आणि लाचार गरिबांवर विकृत छळ लादला जातो ह्याचे वास्तव दर्शन चित्रपटात आहे. पोलीस यंत्रणेचा आणि वकिलांचा सुद्धा एक विकृत आणि एक सुकृत चेहरा ह्या चित्रपटात मांडण्यात आलेला आहे.
गावातील पोलीस  सवार्णनकडून पैसे घेऊन निरपराध लोकांना आरोपी बनवून कसे मरण यातना देतात. ही केस चित्रपटाचा नायक वकील म्हणून कशी चालवतो आणि शेवटी पोलीस यंत्रणाच त्याच्या मदतीला उभी राहते आणि गुन्हेगारांना शिक्षा होते. चित्रपट वास्तविक घटनांवर आधारित आहे  म्हणून आपल्याला तो जरूर पाहायला हवा.
भारतीय नागरिक भारतीय राज्यघटनेतील कलम ३२ नुसार सर्वोच्च न्यायालयात व कलम २२६ नुसार उच्च न्यायालयात मुलभूत हक्काकरिता दाद मागता येऊ शकणाऱ्या घटनात्मक उपाययोजनांचा हक्कातील प्राधिलेख देहोपस्थिती (हेबियस कॉर्पस), महादेश (मँडमस), प्रतिबंध (प्रोहेबिशन), क्वाधिकार (को वॉरंटो), आणि प्राकर्षण (सर्शीओराराय) हे ते प्राधिलेख होत.देहोपस्थिती (हेबियस कार्पास )- सदेह उपस्थित राहणे ‘ याचा वापर करत आदिवासी समाजातील वंचितांना न्याय देण्याचे काम अप्रतिम दाखवलेलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा घटनेतील सर्वात महत्त्वाचे कलम कोणते? असं विचारलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितले की, ” मला कलम ३२ शिवाय इतर कलमाचा निर्देश करताच येणार नाही, कारण कलम ३२ घटनेचा खरा आत्मा व हृदय आहे.” या कलमा नुसार जर कोणत्याही नागरिकाच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. ह्या वरून  आपल्याला हे लक्षात येते कि कलम ३२ किती महत्वाची आहे ते . ह्या चित्रपटाद्वारे संविधानाची ताकत आपल्याला अनुभवास मिळते . आणि ह्या भारत देशात सर्वात ताकतवार आहे ते फक्त आणि फक्त “संविधान”.
—  प्रणय सोहमप्रभा ,नागपूर
- Advertisment -

Most Popular

Recent Comments