Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र*भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक दिवशीय प्रबोधन कार्यक्रम यशस्वी संपन्न*

*भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने एक दिवशीय प्रबोधन कार्यक्रम यशस्वी संपन्न*

मूकनायक तालुका प्रतिनिधी:-प्रशांत नरवाडे
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष आयु राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या  नेतृत्वामध्ये हिंगोली जिल्हा कमिटीच्या वतीने एक दिवसीय प्रबोधन शिबिराचे आयोजन हिंगोली शहरातील शाहूनगर येथील विहारामध्ये करण्यात आले होते या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून आयु. दिनेश हनुमंते, आयु. वैभव धबडगे( राज्य कमिटी पदाधिकारी ) होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आयु. संदीप रणवीर (जिल्हाध्यक्ष – भारतीय बौद्ध महासभा,हिंगोली) उद्घाटक आयु. संजयजी कदम (नांदेड),  प्रज्ञापालजी थेरो (वाशिम) यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अनुयायी यांना त्रिशरण पंचशील दिले. यावेळी मार्गदर्शन करत असताना आयु. वैभव धबडगे  यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा आणि तथागत बुद्ध यांचा संघ यावर मार्गदर्शन केले त्याबरोबर आयु.
दिनेश हमुमंते यांनी  कार्यकर्ता कसा असावा, आपण सर्वांनी एकजुटीने राहावे, कार्यकर्त्यांनी आपला वेळ, बुद्धी आणि कौशल्य धम्म कार्यासाठी दिले पाहिजे असे आवाहन केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आयु.
सिद्धार्थ गायकवाड ( जिल्हाध्यक्ष-  वाशिम), आयु.विलास भालेराव, डॉ. संजय पडघन, आयु.काशीनाथ अंभोरे हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयु. दिनेश खाडे, सूत्रसंचलन मेसाजी गायकवाड यांनी केले तर आभार मिलिंद गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आयु. गौतम खिल्लारे सर, आयु. संभाजी मोगले, आयु. साहेबराव काशिदे, आयु. राहुल घोडके आयु. काशीनाथ खाडे, आयु. निरंजन अभोरे,आयु. रामभाऊ गायकवाड,आयु. प्रकाश मगरे आयु.सिद्धोधन खंदारे, आयु. इंजी.प्रताप नरवाडे,आयु. सिध्दार्थ खिल्लारे आयु. तुकाराम काशीदे आयु.
 सुभाष थोरात आयु. राजाराम मोरे तसेच उपस्थित सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments