मूकनायक :प्रतिनिधी चांदू मोरे. महागांव.
उमरखेड (यवतमाळ) :– मंगळवार दि. १९ रोजी उमरखेड – महागांव विधानसभेचे आमदार नामदेव ससाने यांनी आढावा बैठकी नंतर सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्ग कामाचे व मार्लेगाव येथील पैनगंगा पुलाच्या कामाची आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि सदभाव कंपनी च्या व्यवस्थापकांना अजून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.
महागांव – उमरखेड, हदगांव हायवे संदर्भाने व उमरखेड – महागांव शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था होत असल्याने काही दिवसांपूर्वीच आमदार नामदेव ससाने यांनी उमरखेड येथील शासकीय विश्राम गृहावर बोलविलेल्या मिंटीग मध्ये एनएचआय चे सुनिल पाटील राष्ट्रीय महामार्ग प्रमुख, जगमोहन लोढी कार्यकारी अभियंता, राव साहेब प्रोजेक्ट मॅनेजर ह्यांचेसोबत राष्ट्रीय महामार्ग कामाच्याप्रगतीचा आढावा घेतला होता. या एनएचआय च्या बैठकी नंतर कामाने गती पकडली आहे.
कामाच्या पाहणी प्रसंगी जिल्हा सचिव महेश काळेश्वरकर, पाणीपुरवठा सभापती दिलीपभाऊ सुरते, शिक्षण सभापती प्रकाश दुधेवार यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

