Thursday, February 26, 2026
Homeजालनाधम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुध्द वंदना व धम्मदेसना संपन्न .

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बुध्द वंदना व धम्मदेसना संपन्न .

जालना ( प्रतिनिधी ) दि .14 ऑक्टोबर रोजी जालना शहरातील मस्त गड येथील महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा या ठिकाणी 65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनी पूज्य भन्ते रेवतजी यांनी उपस्थितांना पंचशील व धम्मदेसना दिली .                               धम्मदेसना वेळी पूज्य भन्ते रेवतजी म्हणाले , महामानव डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी तथागत गौतम बुद्धांचा धम्म आम्हाला देऊन 65 वर्ष झाली . अजूनही समाज धम्माच्या शिकवणूकी पासून दूर आहे . त्यांना धम्म समाजाऊन सांगण्यासाठी भिक्खू संघ व भारतीय बौद्ध महासभा यांनी एकत्रीत पणे धम्म कार्य करणे आवश्यक आहे . तरच उपासक धम्माचे अनुयायी होतील . यावेळी भारतीय बौध्द महासभा जालना जिल्हाध्यक्ष प्रेमानंद मगरे , महासचिव संजय हेरकर , भास्कर घेवंदे ,हरिष रत्नपारखे, किरण सोनवणे , राजकुमार दांडगे , आशा दवंडे , अनुराधा हेरकर, कविता मगरे , जयश्री तायडे , सतीष वाहुळे , प्रतीक मगरे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधवाची उपस्थिती होती .

- Advertisment -

Most Popular

Recent Comments