मूकनायक प्रतिनिधी :- विकी वाघमारे. जत, सांगली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान निर्मिती साठी दहा महिन्यापूर्वी ग्रामपंचायत माडग्याळ यांच्या कडे लेखी स्वरूपात निवेदन दिले होते . त्या निवेदनावर आज तागायत कोणत्याही प्रकारे विचार केला नाही, आणि त्या अर्जाला उत्तर दिलेलं नाही, फक्त देतो, देऊया या प्रकारे उत्तरे दिली जात होती. त्यामुळे आज 11 ऑक्टोंबर 2021 रोजी जागा मागणी साठी लाक्षणिक उपोषण करण्याचा ईशारा ऑल इंडिया पँथर चे विकी वाघमारे यांनी माडग्याळ ग्रामपंचायतीला दिला. त्याच अनुषंगाने आज माडग्याळ ग्रामपंचायत समोर सर्व बहुजन नागरिक एकत्र येऊन लाक्षणिक उपोषण केले.
जागा उपलब्ध न करून दिल्यास या पुढील आंदोलन हे तीव्र प्रकारचे असेल असे माडग्याळचे युवक नेते नागेश ऐवाळे हे म्हणाले, तसेच आम्ही दहा महिन्या पूर्वी दिलेल्या अर्जावर ग्रामपंचायतने का विचार केला नाही असा प्रश्न ऑल इंडिया पॅन्थरचे विकी वाघमारे यांनी उपस्थित केला.
या आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जाहीर पाठिंबा मिळाला.
स्व. राजारामबापू पाटील फोंडेशन चे अध्यक्ष संतोष बोगार, मारुतीराव कोरे, परशुराम बंडगर, प्रवीण सावंत यांनी ही आपला पाठिंबा दिला.
तसेच माडग्याळ गावचे पांडुरंग निकम, हणमंत नाटेकर, राजकुमार ऐवाळे, मारुती नाटेकर, दशरथ सावंत, दत्ता सावंत, किशोर कांबळे, अस्लम शेख, लकडेवाडी गावचे सरपंच एकनाथ बंडगर, ऑल इंडिया पॅन्थर चे गिरीष सर्जे, अंगद ऐवाळे, शामभाऊ परीट, सिद्धार्थ नाटेकर, दीपक वाघमारे, विकास हुवाळे, आंबू कांबळे, नजीर शेख, सुरेश हाके, येसाप्पा बंडगर, विजय कांबळे, लोकेश कांबळे, सागर ऐवाळे आदी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते.
###########################





