दौंड मूकनायक प्रतिनिधी: विजय बगाडे
शपथपत्रामध्ये खोटी माहिती सादर केल्याबद्दल पदावरून आपत्र करणे राष्ट्रीय रिपब्लिकन सेना (महाराष्ट्र राज्य) यांची मागणी
दिनांक ०५/०६/२०१८ रोजी पत्रमधील शपथ पत्रा मध्ये खोटी माहिती सादरमौजे सिध्दनकेरी ता. मंगळवेढा येथील कायमचे रहिवासी असल्याचे सिध्दनकेरी या गावाचे पोलीस पाटील पद रिक्त झाल्या करण्यास सदर पदाची मा. तहसीलदार सो. मंगळवेढा यांच्या मार्फत नेमणूक करण्यात आली होती त्यामध्ये ज्योती रमेश पाटील यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते सदर नामनिर्देशन पत्रामध्ये सदरील अर्जदाराचे रेशन कार्ड ओळखपत्र व शपथपत्र याची पूर्तता करतेवेळी सदर शिधापत्रिके मध्ये दोन आपत्ती दिलेले असून सदर अर्जदार यांना तीन आपत्ती असल्याबाबतची माहिती मिळाली असून सदर तीन आपत्ती यांची जिल्हा परिषद शाळा सिध्दनकेरी ता. मंगळवेढा या शाळेमध्ये नोंद असल्याची आठवण आले आहे सदर आपत्तीची नावे प्राची रमेश पाटील, मयुरी रमेश पाटील, व प्रतिक रमेश पाटील, अशी त्यांची नावे आहेत असा दावा राष्ट्रीय रिपब्लिकन सेना (महाराष्ट्र राज्य) यांनी केला आहे सादर तिने आपत्तींची नावे असल्याबाबतची शाळेचे रजिस्टर तसेच पोलीस पाटील यांनी शपथपत्रा सोबत जोडलेली कागदपत्रे या अर्जासोबत दाखल केलेली आहेत असा उल्लेख राष्ट्रीय रिपब्लिकन सेना (महाराष्ट्र राज्य) यांनी निवेदनामध्ये केला आहे मौजे सिध्दनकेरी ता. मंगळवेढा येथील पोलीस पाटील पदाची नेमणूक ज्योती रमेश पाटील यांची असून त्यांचा पूर्ण कारभार त्यांचे पती रमेश जगदेव पाटील हे गैरवापर करीत आहे सदरील पोलीस पाटील यांनी शपथ पत्रावर खोटी माहिती दिली असून सदर पोलीस पाटील यांनी शासनाची फसवणूक व खोटे शपथपत्र व कागदपत्रे दिलेली असून त्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर चौकशी लावण्यात येवन त्यांचे पोलीस पाटील पद रद्द करण्यात यावे व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रीय रिपब्लिकन सेना (महाराष्ट्र राज्य) असंख्य कार्यकर्त्यांनी यांनी कारवाईची मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली

