*राहाता शहरात सत्यशोधक वाचनालयाची सुरुवात करुन समाजसेवक माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनी केली सामाजिक क्रांतीची सुरुवात.*

0
451
*स्रोत- मूकनायक…* अनिल सोमवंशी…*
*आज दि.७/१०/२०२१ वार गुरुवार रोजी राहाता शहरात सामाजिक क्रांतीची सुरुवात झाली….राहाता शहरात माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनी आपल्या वडीलांच्या नावाने सत्यशोधक वाचनालय सुरुवात करण्यासाठी सत्यशोधक पूजन कार्यक्रम ठेवला…*
*शहरातील शिक्षण घेणाऱ्या तरुणांना सामाजिक विचाराची जाणकारी व्हावे तसेच आत्ताच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परिक्षापुर्व तयारी करण्यासाठी लागणारी पुस्तके अभ्यासासाठी मोफत सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने भानुदासजी गाडेकर यांनी हे सत्यशोधक वाचनालय उघडले…*
*आपले वडील बकाजी गाडेकर यांचे स्मृती प्रित्यर्थ वाचनालयाला “सत्यशोधक वाचनालय” हे नाव देऊन त्यांनी कार्यालयाचे उद्घाटन करवले…यानिमित्ताने त्यांनी “सत्यशोधक-पूजन” ठेवले होते…सत्यशोधक पूजनासाठी श्रीयुत झगडे सर यांनी सत्यशोधक पध्दतीने पौरोहित्य करुन समाजाला सत्य-शोधन करण्यासाठी प्रबोधन केले…महात्मा फुले निर्मित सत्यशोधक साहित्यांची पूजन करुन धार्मिकतेला संपूर्ण फाटा देऊन धार्मिक ब्राह्मणांपासून आपले शोषण होऊन देऊ नका असे आवाहन त्यांनी केले…सत्यशोधक पूजनाच्या निमित्ताने सत्यशोधक विचाराने संपूर्ण समाजाला प्रबोधित करताना त्यांनी सांगितले की, आपले धार्मिक शोषण आता आपण होऊ देऊ नका, कोणतेही कर्मकांडातून आपली भ्रामकता वाढवून घेऊन “पैसा-वेळ-श्रम” याचा सत्यानाश करवून घेऊ नका…मिथक सत्यनारायण ही पुरोहित वर्गाची रोजगार हमी योजना आहे, ही पूजा आता बंद करुन बहुजन संत व महापुरुषांचे संघर्ष चरित्र आपण वाचून आपला सामाजिक व सर्व प्रकारचा विकास करवावा…नेहमी चिकित्सा व समिक्षा करुन विज्ञानवाद जोपासावे हेच खरे सत्यशोधक विचार होय…*
*सदर सत्यशोधक वाचनालयाचे उध्दघाटन जेष्ठ नागरिक श्री मोहनदादा सदाफळ यांच्या हस्ते झाले…आपल्या मनोगतात मोहनदादा सदाफळ यांनी सांगितले की, समाजातील तरुणांनी मोबाईल ऐवजी पुस्तकांकडे वळले पाहिजे, सामाजिक पुस्तकांचे वाचन करुन एक सामाजिक विचारांची चळवळ उभी करुन समाजाला “सत्ता-संपत्ती-ज्ञान” यापर्यत घेऊन गेले पाहिजे…*
*काँम्रेड कानिफ तांबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,  या देशात आता तरुणांनी सामाजिक कार्यक्रम,आंदोलने यात भाग घेतला पाहिजे..तरुण हीच आजची देशाची खरी ताकद आहे. देशातील तरुणांनी धार्मिकतेऐवजी शिक्षण,सामाजिक विचार यावर काम करुन यशाची उत्तुंग शिखरे गाठावीत.*
*सत्यशोधक रविंद्र बोरावके यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या तरुणांनी सत्यशोधक विचार वाचून धार्मिक गुलामीतून मुक्त व्हावे हीच शिक्षणाची खरी फलश्रुती असेल…*
*सदर कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक भागुनाथ गाडेकर, साहेबराव निधाने, धनंजय गाडेकर, दिलिप गाडेकर, स्वप्निल गाडेकर, घोडेराव साहेब, शेळके सर, भगवानराव टिळेकर, स्वाधीन गाडेकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी महिलांची संख्या लक्षणीय होती..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब भुजबळ यांनी केले…*
*सत्यशोधक विचाराच्या या कार्यक्रमासाठी सर्व समाजाची लोक मोठया उत्साहाने हजर होती…*