मूकनायक. प्रतिनिधी ता. महागांव.चांदु मोरे-
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील दहागावच्या पुलावरून पाणी असतांना बस चालकाला पाण्याचा अंदाज आला नसतांना एम एच 14 बीटी 50 58 या क्रमांकाची बस पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहे बसमध्ये चार ते पाच प्रवासी असल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी बचावकार्यासाठी प्रशासकीय अधिकारी तैनात झाले आहेत .
– यवतमाळ जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून आज दिनांक 28 रोजी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नांदेड वरून उमरखेड पुसद मार्गे नागपुर जाणारी एसटी बस क्रमांक एम एच 14 बी. टी.5058 ही बस उमरखेड रोडवर असलेल्या दहागाव पुलावरून प्रवास करीत असताना बस चालकाला पाण्याचा अंदाज आला नसल्याने एस टी बस पाण्यात वाहून गेली आहे बस मधील काही प्रवासी यापूर्वीच उतरल्याची माहिती मिळत असून बस मध्ये वाहक चालका सह चार ते पाच प्रवासी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिका कडून मिळत आहे घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी उमरखेडचे तहसीलदार, ठाणेदार , व इतर अधिकारी घटनास्थळी हजर झाले असून बचावकार्य सुरू आहे .


