Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्याखासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते यवतमाळ येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते यवतमाळ येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण.

● मूकनायक : चांदु मोरे
यवतमाळ :– हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास रुग्णवाहिकेची लोकार्पण करण्यात आले या कार्यक्रमाला राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, माजी मंत्री आ. संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
देश आणि विदेशात सध्या आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे . यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज लक्षात घेता थायलंड येथील मैत्रीथाई या सेवाभावी संस्थेमार्फत वैद्यकीय महाविद्यालयास रुग्णवाहिका भेट देण्यात आली. या रुग्णवाहिकेमध्ये ऑक्सिजन सिलेंडर सह अतिदक्षता विभागातील रुग्णाला लागणाऱ्या सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. राज्याच्या औद्योगिक विकास महामंडळाचे आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कर्यक्रमाला अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार उपवैदयकिय अधीक्षक शरद मानकर, अपघात विभाग प्रमुख डॉ. अरविंद कुडमेथे, शल्यचिकित्सक विभाग प्रमुख डॉ. गिरीष जतकर, कान नाक घसा विभाग प्रमुख डॉ. सुरेंद्र गवार्ले, प्रशासकीय अधिकारी संतोष झिंझे, न्यायवैदयक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. भत्रा, अस्थिव्यंग उपचार शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय भारती, चतुर्थ श्रेणी कर्मचारी प्रमुख मनोज गुजरे, वाहनचालक प्रमुख मिश्रा, विकास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments