Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्यानुकसान ग्रस्त शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष

नुकसान ग्रस्त शेतकऱ्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष

महागाव तालुका प्रतिनिधी – मूकनायक

 

– महागाव तालुक्यातील चिचपाड येथील शेतकऱ्याच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गातून होत आहे महागाव तालुक्यातील चिचपाड ,वनोली ,बोरी ,येथील शेतशिवारात सात ते आठ सप्टेंबर रोजी ढगफुटी सारख्या झालेल्या पावसामुळे येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे येथील नुकसानीची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे येथील अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी, शेतकरी नेते स्वाभिमानी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मनीष जाधव यांच्याशी संपर्क साधून येथील नुकसानीची पाहणी करण्यात आली यावेळी चिंताग्रस्त असलेलेस सर्व शेतकरी निशब्द झालेले पाहायला मिळाले प्रचंड नैराश्यात आलेले असून प्रशासन बोथट पद्धतीने काम करत असल्याचे बोलल्या जाते प्राथमिक अंदाजाच्या निष्ककानुसार वनोली व चिचपाड या दोन्ही गावातील व शेतशिवरातील धरून अंदाजे 300 हेक्टर च्या जवळपास नुकसान या गावातील शेतकऱ्यांचे झाल्याचे वृतविल्या जात आहे हे गावे पुसद विधानसभा मतदार संघात येत असून या मतदार संघात एक खासदार व तीन स्थानिक आमदार लाभले असून लोकनियुक्त आमदार पक्ष प्रवेश सोहळ्यात व पक्ष वाढीसाठी पक्षातील कार्यकर्त्यांचा पुनर्वसन ना मध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात आहे मात्र पुसद विधानसभा मतदारसंघातील नेत्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे मग यांना शेतकरी केवळ हा केवळ मतांचा जोगवा मागण्यासाठी आठवतो का ,.. असे येथील नुकसान ग्रस्त शेतकरी वर्गातून बोलल्या जात आहे यावेळी शेतकरी नेते मनीष जाधव यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी संपर्क साधून येथील नुकसान ग्रस्त शेतकऱ्याची व्यथा मांडून झालेल्या प्रचंड नुकसाननीची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन सर्व यंत्रणेला तातडीने सुचित करून सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments