मावळ दि.3 : कामशेत येथील हॉटेल रांगोली येथे मूकनायक पत्रकार संघाची कार्यकारणी बैठक मोठ्या उत्साहात पार पडली. मूकनायक पत्रकार संघाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बाळासाहेब भालेराव व महाराष्ट्र राज्य सचिव मनोज मोरे यांच्या उपस्थितीत मावळ तालुका कार्यकारणी जाहीर केली असून यावेळी मूकनायक पत्रकार संघ यांची उद्दिष्ट, धोरण, व पत्रकार संघ पत्रकारांच्या संरक्षणासाठी सेवा सुविधांसाठी कसा कटिबद्ध असेल. पत्रकारांवर होणाऱ्या टीका ,भ्याड हल्ले यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करून पत्रकारांना योग्य तो न्याय दिला जाईल यावरती संघ सदैव तत्पर असेल.
महाराष्ट्र राज्य प्रभारी बाळासाहेब भालेराव यांनी मावळ तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री सचिन विलास मोरे, कार्याध्यक्ष सुभाष भांडे, कामशेत शहराध्यक्ष कमृद्दिन शेख,तळेगाव शहराध्यक्ष शुभम आढागळे, मावळ तालुका सल्लागार गणेश लाल गुडे अभिमन्यू शिंदे अभिजीत आपटे यांची निवड करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत उमेश रटाटे , आनंद शिरसागर, आदी मान्यवर उपस्थित होते.

