मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड _दौंड मलठण मधील आदिवासी पारधी समाजातील जमिनीवर गावगुंडाचे अतिक्रमण पारधी समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ कोर्टाचा आदेश क्र. कलम-१५५ /एसआर /१८/१२ असतानाही १) उत्तम हेरमा काळे २) महेश अभिष काळे ३) अनिल मोहन काळे ४)समिर शांतीलाल यांचे सर्व मलठण या ठिकाण जमीनी वारसदार असताना देखील न्यायालयात दिनांक २८/०५/२०१४ रोजी मा. उत्तम दिघे दौंड तहसीलदार दौंड तालुका यांच्या न्यायालयात जालिंदर रामभाऊ उगले यांच्या विरोधात १)हामश्या छगड्या काळे २) शांतीलाल हामश्या काळे ३)लतिफ हामश्या काळे ४)हेरमा हामश्या काळे ५)अभिषा हामश्या काळे ६) मोहन हामश्या काळे हे सर्व रा. मलठण दौंड येथील यांच्या विरुद्ध कोर्टाने संदर्भीय आदेश दिले असून आमची मिळकत जुना सर्वे नं. ६२ नविन गट नं. १०१ हे मयत हामश्या छगड्या काळे यांचे क्षेत्र ३१ ए.९ गुंठे+पोट खरब १६ ए. हे क्षेत्र असून अर्जदार जालिंदर रामभाऊ उगले यांनी दिनांक २८/०३/२०१९ रोजी गट नं. ११५,११६,व ११७ क्षेत्र दुरुस्ती करणे बाबत अर्ज सादर केला होता तो न्यायालयात फेटाळण्यात आला असून याबाबत तसा आदेश दिला आहे गट नंबर ११५ या गटात नागनाथ रामभाऊ उगले गट नंबर ११६ जालिंदर रामभाऊ उगले गट नंबर ११७ गोरख रामभाऊ उगले या इसमाने बेकायदेशीर ताबा केलेला असून कागदोपत्री या जमिनीवर हामश्या छगड्या काळे यांच्या नवे असून आम्ही सर्व पारधी समाजातील असून मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने व जमीन बळकावण्याचा हेतूने मेहरबान कोर्टाचा आदेश डावलून कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करून दादागिरी व बाळाचा वापर करून नागनाथ रामभाऊ उगले जालिंदर रामभाऊ उगले हे इसम जमिनीचा ताबा सोडण्यास तयार नाहीत जो पर्यंत जमिनीचा ताबा आम्हा पारधी समाजातील कुटुंबीयांना दिला जात नाही तोपर्यंत आम्ही संविधानिक पध्दतीने सहकुटुंब सहपरिवार लहान मुलांना समवेत २३/०७/२०२५ रोजी उपोषण करूनही शासनाकडून न्याय मिळाला नाही तर तहसील कार्यालय समोर अंगावरती ज्वालाग्राही ओतून आत्मदहनाचा इशारा पारधी समाजातील कुटुंबाने असा इशारा शासनाला दिला आहे. सर्व कागदपत्री पुरावे असतानाही जाणून बसून मानसिक आर्थिक शारीरिक छळ करण्याच्या उद्देशाने नागनाथ रामभाऊ उगले, जालिंदर रामभाऊ उगले, गोरख रामभाऊ उगले हे नाहक त्रास दिल्याबद्दल उगले यांच्या वरती गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करून जमिनीवरून अतिक्रमण हटवून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आमची जमीन आम्हाला परत द्यावी. हामश्या छगड्या काळे यांची जमीन बळकावण्या साठी दबाव तंत्राचा वापर करून जमीन हडपण्यासाठी प्रयत्न करत आहे माननीय तहसीलदार सो आपण आम्हास काळे कुटुंब न्याय मिळवून द्यावा. अन्यथा उपोषण करत असताना पोलिसांनी अटक केली तरी जेलमध्ये आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा पारधी समाजातील काळे कुटुंबे यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

