वसमत प्रतिनिधी आळणे मिलिंद
टेभूर्णी:चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय .टेंभुर्णी ता.वसमत जि.हिगोली .माध्यमिक शाळांत परीक्षा इयत्ता 10 मध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कु तनुजा प्रमोद आळणे,: कु. आरती शिवाजी सवंडकर, कु. शिवानी मुंजाजी सवंडकर. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सवंडकर सर प्रमुख पाहुणे गोविंद काका सवंडकर, प्रसादराव सवंडकर ,आबासाहेब सवंडकर, उत्तम सवंडकर, राजेश सवंडकर इ. मान्यवर उपस्थित होते. शाळेमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना रुस्तुम आळणे सर यांच्याकडून अनुक्रमे 1001 , 701, 501 रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
तसेच राजेश सवंडकर यांच्याकडून त्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा रजिस्टर बक्षीस म्हणून देण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेची ऋण व्यक्त केले. श्री धोंडे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर श्री जाधव सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रुस्तुम आळणे सरांनी विद्यार्थ्यांना आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे भविष्यात अभ्यासक्रम कसा निवडावा याचे मार्गदर्शन केले. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री सवंडकर सर यांनी आपल्या मनोगतातून विदयार्थी साठी मराठी शाळेचे महत्व पटवून दिले.
याप्रसंगी नामदेव जाधव साहेब लाईनमेन, गणेश आळणे (मा.सरपंच ), राजकूमार आळणे,मिलिंद आळणे समतादूत (बार्टी) गुलाब आळणे,प्रमोद आळणे ,मधूकर आळणे , किरण आळणे,अनिल आळणे , मिलिंद खंदारे याच्या कडून भावी क्षैकणिक वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्या दिला. विध्यार्थी, विध्यार्थी नी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

