मूकनायक वसमत प्रतिनिधी मिलिंद आळणे
वसमत, दि. 10 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचची स्वायत्त संस्था संस्था. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधनव प्रशिक्षण संस्था (बार्टी )पुणे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोंवदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली समतादूत , मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागनाथ काळे (नेत्र रोग तज्ञ)साहेब हे होते .तर प्रमुख पाहुणे डॉ संदीप कंधारे साहेब हे होते.नेत्रदानाचे महत्व लक्षात घेऊन दरवर्षी 10 जून हा दिन ‘जागतिक दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या माध्यमातून लोकांमध्ये नेत्रदानाची जनजागृती केली जाते. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 10 जून हा दिन ‘दृष्टिदान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
जागतिक दृष्टीदान दिनाचं महत्त्व नेमकं काय? जागतिक दृष्टीदान दिनाचं सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजेच लोकांना नेत्रदानाचं महत्त्व पटवून देणे आणि नेत्रदानाविषयी जनजागृती करून लोकांना मृत्यूनंतर डोळे दान करण्याची प्रतिज्ञा घेण्यास प्रवृत्त करणे असा आहे. भारतासह अनेक देशांमध्ये आजही अंधत्व ही मुख्य समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार कार्निया संबंधित आजार, मोतीबिंदू आणि काचबिंदू नंतर होणाऱ्या दृष्टी हानि आणि अंधत्वच्या मुख्य कारणांपैकी आहे.
यावेळी रवी वाघमारे ,वैभव बैले,मंगेश पडोळे, बालाजी सुर्यवंशी, बालाजी चव्हाण, प्रणव आळणे,आनंद वायव्हळ. आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

