Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रAqua Line Metro: मेट्रो स्टेशन बनले स्विमिंग पूल....वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचं...

Aqua Line Metro: मेट्रो स्टेशन बनले स्विमिंग पूल….वरळीच्या भुयारी मेट्रो स्टेशनमध्ये पावसाचं पाणी साचलं; …. नकली बांधकाम

मुंबई: नुकतंच उद्घाटन झालेलं वरळी येथील भुयारी अंडरग्राउंड मेट्रो स्टेशन पावसामुळे अक्षरश: स्विमिंग पूलमध्ये बदललं आहे. पावसाचं पाणी स्टेशनमध्ये साचून प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून, मेट्रो प्रशासनाच्या कामाची निकृष्ट गुणवत्ता आणि दोषपूर्ण नियोजन स्पष्टपणे उघड झाली आहे.कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले हे प्रकल्प इतक्या लवकर अपयशी ठरणं, ही धक्कादायक बाब आहे. सामान्य प्रवासी आणि नागरिक यांचे जीव धोक्यात आले असताना, मेट्रो प्रशासन मात्र मूक दर्शक बनलेलं आहे.विशेष म्हणजे, या घटनेचे व्हिडीओ आणि रिपोर्टिंग करण्यासाठी पोहोचलेल्या पत्रकारांना मेट्रो प्रशासनाच्या सुरक्षा रक्षकांकडून कव्हरेज करण्यास मज्जाव करण्यात आला. हा प्रकार अत्यंत दुर्दैवी असून, मेट्रो प्रशासनावर नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं देण्याची जबाबदारी आहे, मात्र प्रश्न टाळण्यासाठी माध्यमांना रोखलं जातंय, हे लोकशाहीला धोका देणारं आहे.जनतेचा कराचा पैसा खर्च करून उभारलेल्या अशा भव्य प्रकल्पांची गुणवत्ताच निकृष्ट असेल, तर त्याला जबाबदार कोण?मेट्रो प्रशासनावर कारवाई कधी होणार?अशा घटनांना जबाबदार असलेल्यांची चौकशी कधी होणार?नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रकल्पांची गुणवत्ता तपासणी कधी होणार?ही सर्व प्रश्नं अनुत्तरित असून, प्रशासनाने याची तपासणी करून दोषींवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.Aqua Line Metro च्या या घटनेमुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला आहे, आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments