Thursday, February 26, 2026
Homeनागपूरबुटी बोरी येथे तीन दिवशीय बुद्ध धम्म महोत्सव

बुटी बोरी येथे तीन दिवशीय बुद्ध धम्म महोत्सव

– १२ ते १४ मे पर्यंत रंगणार प्रबोधनात्मक मैफिल

– बुद्ध जयंती समारोह समितीचा उपक्रम

तालुका प्रतिनिधी

नागपूर, ८ : जगाला शांती,मैत्री तथा बंधुता यांचा संदेश देऊन, विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या २५८८ व्या जयंती निमित्य बुटी बोरी येथे भव्य तीन दिवसीय बुद्ध धम्म महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या संपूर्ण विश्वात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून, आपल्या देशातही काश्मीर, पहलगाम येथे दहशतवादयांनी भ्याड हल्ला केला आहे.जगातील ही युद्धाची परिस्थिती बघूनच जगाला युद्ध नको तर बुद्धच हवाय हे सांगण्यासाठी बुद्ध जयंती निमित्य,बुद्ध धम्म महोत्सव कार्यक्रम बुद्ध जयंती महोत्सव समिती, सातगाव,बुटी बोरी द्वारा दि १२ ते१४ मे दरम्यान सिडको मैदान,औधोगिक परिसर बुटी बोरी येथे आयोजित करण्यात आला आहे.

कार्यक्रमाचे उदघाटन दि १२ मे ला सकाळी ८:०० वाजता भदंत महानाम, महास्थवीर यांचे हस्ते करून सर्वजनिक त्रिशरण, पंचशील व बुधवंदना घेण्यात येईल.तर सायंकाळी ६:०० वाजता प्रज्ञा मैत्री बौद्ध विहारातून विशाल धम्म रॅली काढून बुटीबोरी येथील सर्व परिसरातील रॅली सह कार्यक्रम स्थळी येतील.त्यानंतर बाबासाहेबांनी बुद्ध धम्मच का दिला या विषयावर धम्माचारी अमृतदीप यांच्ये व्याख्यान व रात्री ८:०० वाजता जीवनात संघर्ष करणाऱ्या अंध बांधवाचा म्युजिकल ग्रुप ‘स्पर्श दृष्टीदिव्यांगाचा स्वर’ हा गीतांचा कार्यक्रम सादर करेल.दि १३ मे ला सकाळी ८:३० वाजता भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या अध्यक्षतेत तर सत्यशोधक महासंघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डी एस नरसिंगे,भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय संघटक इंजि. पद्माकर गणवीर व भारतीय बौद्ध महासभेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष विलास उंदीरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर धर्मातील बांधवाना धम्मदिक्षा दिली जाईल सायंकाळी ७:०० वाजता आवाज इंडिया टीव्ही चे संचालक अमन कांबळे व उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत इतर धर्मातून बौद्ध धम्माची दिक्षा घेणाऱ्या धर्मांतरित बांधवांचा सत्कार व त्यानंतर अशोक जांभुळकर दिगदर्शित अहिंसक अंगुलीमाला हे महानाट्य दाखविण्यात येईल.तर दि १४ मे ला सकाळी ८:०० वाजता सामूहिक त्रिशरण,पंचशील सायंकाळी ७:००वाजता बुद्ध धम्म व त्याचे भविष्य या विषयावर कोल्हापूर येथून येणारे पाली भाषा व धम्म आभासक अमित मेघावी यांचे व्याख्यान होईल. तर सायंकाळी ८:०० वाजता महाराष्ट्राचे लाडके गायक उमेश बागडे व भीमाची वाघीण निशा धोंगडे यांच्यात प्रबोधनत्मक वैचारिक दणदणीत संगीतमय सामना ‘आवाज निळ्या क्रांतीचा, जल्लोष भीम बुद्ध गीतांचा ‘ हा बहारदार संगीतमय कार्यक्रम राहील.त्यानंतर भव्य भोजनदानाणे कार्यक्रमाची सांगता होईल.तरी या बुद्ध महोत्सवाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त जनतेने उपस्थित राहण्याचे आव्हान बुद्ध जयंती समारोह समितीच्या सर्व कार्यकर्त्यांनी यांनी केली आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments