Thursday, February 26, 2026
Homeकोल्हापूरशाहूराज्यांच्या स्मृतिदिनी संगीतप्रधान मनोरंजनाचे कार्यक्रम? सामाजिक कार्यकर्त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी

शाहूराज्यांच्या स्मृतिदिनी संगीतप्रधान मनोरंजनाचे कार्यक्रम? सामाजिक कार्यकर्त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी

मुकनायक कोल्हापूर प्रतिनिधी राहुल कांबळे

कोल्हापूर, दि ७ : छत्रपती शाहू महाराज यांच्या १०३व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक ६ मे २०२५ रोजी कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनामध्ये अभिवादन व प्रबोधनात्मक कार्यक्रम अपेक्षित असताना, त्या ठिकाणी मनोरंजनात्मक संगीतप्रधान कार्यक्रमाचे आयोजन झाल्याने सामाजिक क्षेत्रात नाराजीचा सूर उमटत आहे.या प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते से.नि.सीमाशुल्क अधिकारी मदन लाला पवार (नवी मुंबई) यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवित जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना लेखी निवेदनाद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पत्रात त्यांनी नमूद केले आहे की, “शाहूराज्यांच्या स्मृतिदिनी अशा प्रकारचा मनोरंजनात्मक कार्यक्रम सामाजिकदृष्ट्या असंवेदनशील, अनुचित आणि असंयुक्तिक आहे. प्रशासनाकडून अशा परवानगी देणे हे शाहू महाराजांच्या विचारधारेशी विसंगत आहे.”पुढे बोलताना पवार यांनी शासनाकडे विनंती केली आहे की, “भविष्यात म. ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनी केवळ महापुरुषांचे स्मरण, अभिवादन, सामाजिक प्रबोधन व संविधान मूल्यांवर आधारित कार्यक्रमांनाच परवानगी द्यावी.”या निवेदनात त्यांनी प्रशासनाला भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कार्यप्रणालीबाबत दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. सदर प्रकारावर प्रशासनाची भूमिका काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments