Thursday, February 26, 2026
Homeनवी मुंबईनवी मुंबई पालिका क्षेत्रातील मागासवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतीक यादव यांचे आयुक्त डॉ....

नवी मुंबई पालिका क्षेत्रातील मागासवर्गीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रतीक यादव यांचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन…

नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मागासवर्गीय समाजाला भेडसावणाऱ्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, या मागणीसाठी आरपीआय ए नवी मुंबई संपर्क प्रमुख प्रतिक यादव यांनी पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.या निवेदनात त्यांनी मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आरोग्य सुविधा, शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी विशेष उपाययोजना, तसेच वसतिगृह व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. यादव यांनी पालिका क्षेत्रातील काही झोपडपट्ट्यांमध्ये पायाभूत सुविधा अद्यापही अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले.यावेळी बोलताना प्रतीक यादव म्हणाले की, “नवी मुंबईसारख्या प्रगत शहरात मागासवर्गीय समाज अजूनही मूलभूत हक्कांपासून वंचित आहे. हे चित्र बदलण्यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशील आणि ठोस पावले उचलावी लागतील.”पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनीही निवेदनाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.प्रतीक यादव यांच्या या उपक्रमामुळे मागासवर्गीयांच्या समस्या अधिक प्रभावीपणे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments