मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे
,स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा सौ करुणाजी धनंजय मुंडे यांच्या बद्दल काही दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संगीता वानखेडे व अनिल गर्जे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन आज दि ८ एप्रिल २०२५ महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री गृहमंत्री यांना बारामती चे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत पाठविण्यात आले अशी माहिती स्वराज्य शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव मा प्रशांत विष्णु सोनवणे यांनी दिली आहे,सौ करुणाजी धनंजय मुंडे यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असून महाराष्ट्र शासनाने त्वरित पोलीस संरक्षण द्यावे तसेच संगीता वानखेडे व अनिल गर्जे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली, त्या वेळी पुणे जिल्हा महासचिव मा दत्तात्रय वसंत माने, माळेगांव शहराध्यक्ष मा विठ्ठल मोहन सोनवणे, बारामती तालुका उपाध्यक्ष मा अजय आण्णा चौधरी यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,

