Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रMBCPR समूहाची शोध मोहीम…

MBCPR समूहाची शोध मोहीम…

महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत नोंद असलेल्या बुद्ध लेण्यांच्या माळेत आणखी एका लेणीची भर….

(गोपीनाथ सोनावणे खालापूर रायगड)
महाराष्ट्र राज्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात कर्जत खोपोली मार्गात बीड खुर्द या गावाच्या हद्दीत असलेल्या डोंगरात एक लेणी मिळाली असून ही लेणी स्थानिक गावकरी यांना माहीत होती पण त्यांच्या माहितीप्रमाणे ती पांडवांनी कोरली अशी अख्यायिका असल्याने त्यांचा तिकडे जास्त वावर नव्हता.

काही महिन्यांपूर्वी MBCPR (Movement of Buddhist Caves Preservation and Restoration) समूहाचे सदस्य बंधु राकेश गायकवाड या बीड खुर्द येथील रहिवासी आणि भारतीय बौद्ध महासभाचे बौद्धाचार्य तथा सामाजिक कार्यकर्ते आयुष्यमान बंधू गणेश केदारी यांच्याशी लेणीविषयी चर्चा झाली.
त्यानंतर पुन्हा ३ नोव्हेंबर या दिवशी MBCPR तर्फे प्रभाकर जोगदंड, राकेश गायकवाड आनंद खरात, अतिश ढोणे आणि सोबतीला गणेश केदारी असे तिघे जण पुन्हा भेट दिली असता तिथे खालील लेणी अवशेष दिसले.

इथे एक भिख्खू निवास आहे. याच्या आकाराची मोजणी खालील प्रमाणे आहे.
बाहेरील दर्शनी भाग
उंची ६ फूट ६ इंच
रुंदी ७ फूट ५ इंच
लांबी ७ फूट
दरवाजा रुंदी २ फूट
आतील भिख्खू बसण्याचे आसन लांबी ६ फूट ५ इंच, रुंदी २ फूट आणि उंची दीड फूट.
या निवासाच्या बाहेरील भिंतीवर धम्मलिपी मध्ये एक शिलालेख असून त्याचे सुरुवातीचे काही शब्द नष्ट झालेले आहेत. शिलालेखाच्या सुरवातीला उलटे स्वस्तिक असून “मल(सरी) गिरनं कोझकाने पुसादो” असे शब्द वाचता येतात.

उजव्या बाजूला नैसर्गिक गुहा असून त्यात थोडेफार कोरीव काम करून भिख्खू बसू किंवा राहू शकतात इतकी जागा आहे.
त्याच्याच उजव्या बाजूस अजून एक लहान गोलाकार आकाराची अजून एक गुहा आहे ज्यात एक जण फक्त बसू शकतो इतकी उंच आहे त्यात एक जण झोपू शकतो अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. यातील आतल्या बाजूस उजवीकडे अजून एक शिलालेख आहे ज्यात “सिहपभरो(क)” अशी अक्षरे दिसतात.

चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त दिनांक ०६/०४/२०२५ रोजी बुद्ध लेणी संवर्धन आणि संरक्षण या संघटनेची श्रमदान मोहीम पार पडली. लेणी समोर दगडाची भर टाकणे, काटेरी झाडे आणि दगड बाजूला करून नविन रस्त्याची निर्मिती करणे, लेणीची साफसफाई करणे. इत्यादी कामे संघटने तर्फे धम्मदानातून व श्रमदानातून करण्यात आली. श्रमदान मोहीमेत जवळपास ४० लेणी संवर्धकांनी सहभाग घेतला.

जर कोणाला इथे भेट द्यायची असेल तर खालील प्रकारे जाता येईल.

या ठिकाणी जाताना मध्य रेल्वेच्या सीएसटी खोपोली मार्गातील डोलवली या ठिकाणी उतरून शेअर ऑटो किंवा खासगी वाहनाने गावात जाता येते.

गावाच्या शेवटी काजू बागेच्या दिशेने गेलात की सारनाथ बुद्ध विहार लागते. तिथून बाजूने वरच्या दिशेने जाताना काही घरे लागतात. तिथे चौकशी केल्यास किंवा सोबतीला गावातील काही मुले किंवा रहिवाशी त्यांना रस्ता दाखवण्यास विचारले आणि त्याबद्दल त्यांना मोबदला दिला की ते लेणी पर्यंत घेऊन जातात.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments