Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड शहराच्या वतीने असंख्य भिम अनुयायीचे बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती ** आंदोलन...

दौंड शहराच्या वतीने असंख्य भिम अनुयायीचे बुध्दगया महाबोधी महाविहार मुक्ती ** आंदोलन मोर्चा


चला एक साथ एक पाऊल धम्म पथावर
एकजुटीतून बदल घडवूया मूकनायक प्रतिनिधी
विजय बगाडे

दौंड -बिहार मधील महाबोधी महाविहार बुद्धगया येथे २३ दिवसांपासून सुरू असलेल्या बौद्ध भिक्खू व बौध्द समाजाचे वतीने मुक्ती आंदोलनास पाठिंबा दर्शवत महाबोधी महाविहार ब्राह्मणी करण्यापासून मुक्त करणेबाबत सत्वर कार्यवाही करावी त्या अनुषंगाने दौंड मध्ये बुधवार दिनांक १२/मार्च रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली दौंड शहराच्या दिशेने तहसील कार्यालय परिसरात आंदोलनाची सांगता करण्यात आली आंदोलन मध्ये असंख्य भीम अनुयायी सहभागी होते हिंदू मंदिराचे देखरेखी साठी हिंदूंचेच लोक असतात मुस्लिमांचे मशिदीची देखभाल मुस्लिम समाजच करीत असतात जैन धर्मीय जैन मंदिराची देखभाल जैन लोक करीत असतात त्याच अनुषंगाने महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांची ज्ञानप्राप्ती झालेल्या बोध्दगया येथील महाबोधी महाविहार बौध्द धम्मीय भिक्खू व बौध्द धम्मीय अनुयायी यांचे व्यवस्थापना खाली असणे ही बाब न्यायिक असल्याने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन साठी बौध्द भिक्खू व बौद्ध धम्मीयाचे वतीने बुध्दगया येथे आंदोलन चालू असून त्यास देश जगभरातील बौध्द धम्मीय अनुयायी यांनी पाठिंबा दिला आहे बुध्दगया येथील तथागत बुद्धांचे ज्ञान प्राप्ती भूमीवरील महाबोधी महाविहाराचे ब्राह्मणी करण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात येत असल्याने बुध्दगया १९४९ कायदा मध्ये दुरुस्ती करून महाबोधी महाविहार बौध्दांचे देखरेखी खाली व्यवस्थापनासाठी देण्यात यावे वास्तविक भारतीय संविधानाचे अनू १३ नूसार दि,२६, जानेवारी १९५० पूर्वीचे कायदे निष्कासित करण्यात आले असल्याने अनु ,१३ ची अंमलबजावणी करुन महाबोधी महाविहार ब्राह्मणी करण पासून मुक्त करणे, असे निवेदनात नमूद केले आहे. बी.वाय. जगताप भारत सरोदे नागसेन धेंडे सचिन खरात सागर उबाळे राजेश मंथने आदींनी आपले मनोगत केले

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी एकत्र येऊन हा एकजुटीतून बदल घडवूया

- Advertisment -

Most Popular

Recent Comments