Thursday, February 26, 2026
Homeताज्या बातम्याबारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, अन्यथा आत्मदहन...

बारामती बस स्थानकास विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या, अन्यथा आत्मदहन करणार, स्वराज्य शक्ती सेनेचे नेते प्रशांत सोनवणे

वरिष्ठ प्रतिनिधी अक्ष्मण रोकडे मूकनायक दि. २१ जानेवारी २०२५ बारामती बस स्थानकास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे म्हणून गेली वीस वर्षांपासूनच्या मागणी कडे महाराष्ट्र शासनाने व बारामतीचे लोकप्रतिनिधी शरदचंद्रजी पवार, अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत आहेत, स्वराज्य शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करुणाजी धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार दि १७ जानेवारी २०२५ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना बारामतीचे उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन पाठविण्यात आले आहे, बारामती बस स्थानकास भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याबाबत तसेच बस स्थानक ज्या लोकांच्या जागेवर बांधण्यात आले आहे, अशा काही भुमी पुत्रांना अद्याप पर्यंत एक रुपया ही मोबदला महाराष्ट्र शासनाकडून मिळालेला नाही. त्यांना चालु बाजार भावाप्रमाणे मोबदला मिळावा अन्यथा भारतीय प्रजासत्ताक दिनी म्हणजे दि. २६ जानेवारी २०२५ रोजी बारामती बस स्थानकाच्या आवारात सकाळी नऊ वाजता मी प्रशांत विष्णु सोनवणे व माझे सहकारी दत्तात्रय वसंत माने आम्ही दोघे आत्मदहन करणार आहोत. असे निवेदनात नमूद करण्यात आल्याची माहिती स्वराज्य शक्ती सेनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत विष्णु सोनवणे यांनी दिली आहे, त्यावेळी स्वराज्य शक्ती सेनेचे पुणे जिल्हा महासचिव दत्तात्रय वसंत माने, बारामती तालुका अध्यक्ष महिबुब सय्यद, बारामती तालुका उपाध्यक्ष अजय आण्णा चौधरी, माळेगांव शहराध्यक्ष विठ्ठल सोनवणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments