Saturday, July 25, 2026
Homeठाणेअंबाडी तालुका काळाची गरज स्थानिक कृती समिती द्वारे लाक्षणिक उपोषण

अंबाडी तालुका काळाची गरज स्थानिक कृती समिती द्वारे लाक्षणिक उपोषण

भिवंडी मूकनायक प्रतिनिधी राजरत्न जाधव

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील अंबाडी विभागाची भौगोलिक परिस्थिती पाहता दिनांक 22 जुलै 2026 रोजी स्थानिक नागरिकांची अंबाडी विभागाला स्वतंत्र तालुका घोषित करण्याची मागणी अंबाडी तालुका कृती समिती द्वारे जोर धरू लागली आहे. अंबाडी विभागाला जोडलेली असंख्य गावे आणि प्रत्येक गावातील असंख्य समस्या सोयी सुविधा मार्गी लावण्यासाठी अंबाडी तालुका होणे फार महत्वाचे आहे असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

अंबाडी विभागाची तसेच त्याला जोडलेल्या असंख्य गावांची एकंदरीत भौगोलिक स्थिती पाहता स्थानिक नागरिकांच्या गावपातळीवरच्या समस्या तसेच सुविधांचे तक्रारी घेऊन दूरवर वसलेल्या भिवंडी शहरात फेरफटका मारावा लागत असतो त्यात दरवेळेस होणाऱ्या फेऱ्या कामकाजाची तरतुदीची वेळ ह्यात बहुतांशी वेळ आणि पैसा नागरिकांचा वाया जात असतो.

तसेच अंबाडी विभागातील वाढणारी लोकसंख्या आणि तेथील भविष्यातील जनसुविधांवरील व्यवस्थापन ह्या सर्व प्रक्रियेवर योग्य हाताळणी करण्यासाठी आणि नागरिकांची शासकीय विकास कामे सुलभ करण्यासाठी अंबाडी तालुका होणे ही वेळेची अत्यंत गरज आहे.

ही मागणी मागच्या खूप वर्षापासून जोर धरून आहे.आज ह्या मागणीला शासन दरबारी अंमलात आणण्यासाठी अंबाडी स्थानिक कृती समिती तर्फे लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी पाऊल उचलण्यात आलं आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments