मूकनायक प्रतिनिधी, मुंबई (महाराष्ट्र)
प्रकाश लांडगे

इंदोर (मध्यप्रदेश): विश्वरत्न महामानव, नवभारत निर्माता बोधिसत्व यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मभूमी महू येथे 13 एप्रिल 2026 रोजी रात्री 12 वाजता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल इंदोर शाखेच्या वतीने भव्य मानवंदना कार्यक्रम पार पडला. जन्मभूमीवरील स्मारकात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या नेतृत्वाखाली अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी, मध्यप्रदेश उत्तर राज्य अध्यक्ष आर. सी. दिवाकर, मध्यप्रदेश दक्षिण राज्य सरचिटणीस व लेफ्टनंट कर्नल उत्तम प्रधान, उपाध्यक्ष शांताराम वाघ, उपाध्यक्ष संतोष गवले, इंदोर जिल्हा अध्यक्ष शुभम रायपुरे, एस.एस.डी. जिल्हा उपाध्यक्ष विशाल इंगळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे (ठाणे), मेजर जनरल मधुकर हिवराळे (नवी मुंबई) यांच्यासह इंदोर, दतिया, भोपाळ, नवी मुंबई, ठाणे, जळगाव, बुलढाणा आदी जिल्ह्यांमधून मोठ्या संख्येने महिला व पुरुष सैनिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावून मानवंदना दिली.

पूज्य भंते ज्ञान ज्योती आणि भीम जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते प्रज्ञाशील यांच्या हस्ते त्रिसरण पंचशील व भीमस्मरण सामूहिकरित्या घेण्यात आले. त्यानंतर आकाशात फटाके उडवून जयंतीचा उत्साह साजरा करण्यात आला.
सकाळी इंदोर येथील राजवाडा येथे ॲड. डॉ. भंडारे, बी. एच. गायकवाड, आर. सी. दिवाकर, उत्तम प्रधान आणि राहुल इंगळे यांनी यांना अभिवादन केले. त्यानंतर राजवाडा संग्रहालयाला भेट देऊन इंदोर संस्थानच्या 14 नरेशांची माहिती जाणून घेतली.
दि. 12 एप्रिल 2026 रोजी संविधान समर्थक जोडो अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात ॲड. डॉ. एस. के. भंडारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, यांनी संविधान लिहिताना समता, न्याय व बंधुता यांचा पाया रचला. मात्र आजही काही शक्ती संविधान बदलण्याच्या भाषा करीत आहेत, आरक्षण व शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि जाती-धर्मांमध्ये फूट पाडून असहिष्णुता वाढवली जात आहे. या पार्श्वभूमीवर संविधानाने दिलेले समानतेचे अधिकार आणि हक्क अबाधित ठेवण्यासाठी संविधान समर्थक समाज एकत्र आणणे अत्यंत गरजेचे आहे. याच माध्यमातून बाबासाहेबांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती अधिक गतिमान करावी, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या सभेत राष्ट्रीय सचिव बी. एच. गायकवाड गुरुजी, जयेश आदिवासी युवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश मुजलडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा समितीचे अध्यक्ष डॉ. राजेश सोनगरा, भंते प्रज्ञाशील आदी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

सायंकाळी बडा गणपती ते राजवाडा अशी भव्य भीम ज्योती यात्रा काढण्यात आली. इंदोर शहरातील विविध भागांतून निघालेल्या रथांसह, डीजेच्या गजरात हजारो आंबेडकरी नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते. रात्री 10 वाजता राजवाडा येथे यात्रेचा समारोप करण्यात आला. त्यानंतर संविधान समर्थक जोडो अभियानांतर्गत एससी, एसटी व बौद्ध समाज संघटनांच्या प्रतिनिधींची अभिवादन सभा पार पडली. प्रमुख अतिथी ॲड. डॉ. एस. के. भंडारे व भंते प्रज्ञाशील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या यात्रेतील विशेष आकर्षण म्हणजे भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, , , माता रमाई आणि यांच्या वेशभूषेत सजलेले तरुण-तरुणी, तसेच घोडे व रथ यांची भव्य मिरवणूक होती. भिक्खू संघही मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

कार्यक्रमाच्या शेवटी चर्चेनंतर भीम जन्मभूमी बचावासाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, जन्मभूमी स्मारक समिती व जन्मभूमी बचाव आंदोलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कोर कमिटी स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम रायपुरे व विशाल इंगळे यांनी केले.
मूकनायक मुंबई ब्युरो चीफ
प्रकाश लांडगे…9920806563

