Friday, April 17, 2026
Homeइंदौरमहू ,इंदोर मध्ये निळे वादळ ...

महू ,इंदोर मध्ये निळे वादळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती गतिमान करण्यासाठी संविधान समर्थक समाज जोडावे लागतील – -ॲड डॉ एस के भंडारे

इंदोर(मध्यप्रदेश): विश्वरत्न महामानव, नव भारत निर्माता बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जन्म भूमी, महू येथे दिनांक 13/4/2026 रोजी रात्री 12 वाजता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल इंदोर शाखेच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी, महू येथील भव्य स्मारक मध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड डॉ एस के भंडारे यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी, मध्यप्रदेश उत्तर राज्य अध्यक्ष आर सी दिवाकर,मध्यप्रदेश दक्षिण राज्य सरचिटणीस व लेफ्टनंट कर्नल उत्तम प्रधान, उपाध्यक्ष शांताराम वाघ, उपाध्यक्ष संतोष गवले,इंदोर जिल्हा अध्यक्ष शुभम रायपुरे, एस एस डी जिल्हा उपाध्यक्ष विशाल इंगळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच समता सैनिक दलाचे लेफ्टनंट जनरल रमेश वाघमारे (ठाणे), मेजर जनरल मधुकर हिवराळे (नवी मुंबई) आणि इंदोर, दतिया, भोपाळ, नवी मुंबई, ठाणे, जळगाव, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पुरुष व महिला सैनिक व कार्यकर्ते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली. पूज्य भंते ज्ञान ज्योती, भीम जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते प्रज्ञाशील यांच्या हस्ते त्रिसरण पंचशील, भीमस्मरण सामूहिक घेण्यात आले. त्यानंतर आकाशात फटाके उडवन्यात आले.

सकाळी राजवाडा येथे ॲड डॉ भंडारे, बी एच गायकवाड , आर सी दिवाकर,उत्तम प्रधान , राहुल इंगळे यांनी राणी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले व त्यांच्या राजवाड्यातील संग्रहालय याला भेट देऊन इंदोर संस्थांनच्या 14 नरेशांची माहिती समजून घेतली.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळेस संविधान लिहिले त्यावेळी विषमतेच्या चातुर्वर्ण विचाराचे लोकांनी अस्पृशाने संविधान लिहिले ते कितीही चांगले असले तर ते आम्हाला मान्य नाही, तीन आकडा आमच्यासाठी अशुभ आहे त्यामुळे तिरंगा आम्हाला मान्य नाही असे लोक सत्तेत येऊन आम्हाला संविधान बदलायचे आहे असे बोलून आरक्षण, शिक्षणापासून वंचित ठेऊन , जाती जाती- धर्मा धर्मा मध्ये वाद निर्माण होऊन असहिष्णुता वाढत आहे. त्यामुळे संविधानाने दिलेले समानतेचे अधिकार व हक्क शाबुत ठेवावे लागतील त्यासाठी संविधान समर्थक समाज एकत्र करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची सामाजिक, धार्मिक व राजकीय क्रांती गतिमान करावी असे दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड डॉ एस के भंडारे यांनी दि. 12/4/2026 रोजी संविधान समर्थक जोडो अभियान अंतर्गत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल इंदोर जिल्हा शाखेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी आणि क्रांतीवीर महात्मा जोतिराव फुले यांची 199 वी जयंती महोत्सव कार्यक्रमात मार्गदर्शन केले. सभेमध्ये राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी , जयेश आदिवासी युवा संघटन चे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश मुजलडा, डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा समितीचे अध्यक्ष डॉ राजेश सोनगरा, जन्मभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भंते प्रज्ञाशील, इत्यादींनी आपले विचार मांडले.प्रथम सायंकाळी बडा गणपती ते राजवाडा अशी भीम ज्योती यात्रा इंदोर शहरातील सर्व नगरातून वेगवेगळे रथ ,डी जे सह हजारो आंबेडकरी जनता सहभागी झाले होते. भीम ज्योती यात्रेचा समोरोप रात्री 10 वाजता राजवाडा येथे करून तेथे संविधान समर्थक समाज जोडो अभियान अंतर्गत एस सी,एस टी, बौद्ध समाज संघटनाच्या प्रतिनिधींची अभिवादन सभा घेण्यात आली. प्रथम प्रमुख अतिथी ॲड डॉ एस के भंडारे यांच्या व भंते प्रज्ञाशील यांच्या हस्ते दिप प्रज्वलित करून सभेला सुरुवात केली. या यात्रेमध्ये भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले,माता रमाई, माता अहिल्यादेवी होळकर इत्यादी महामानवांचे वेशभूषा केलेले तरुण -मुले मुलींनी घोडे व रथातून होते हे खास आकर्षण बनले होते.भिक्खू संघ ही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आणि शेवटी चर्चेअंती डॉ भीमराव य आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भीम जन्मभूमी बचावसाठी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, जन्मभूमी स्मारक समिती, जन्मभूमी बचाव आंदोलन समिती या सर्वांची मिळून एक कोर कमिटी करण्याबाबत जाहीर करण्यात आले. सूत्रसंचलन सुभम रायपूरे व विशाल इंगळे यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments