Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्ररायगड इर्शाळ वाडीवासीयांवर दुःखाचा डोंगर :250 लोकसंख्येचं गाव दरडीखाली ..!

रायगड इर्शाळ वाडीवासीयांवर दुःखाचा डोंगर :250 लोकसंख्येचं गाव दरडीखाली ..!

(मूकनायक प्रतिनिधी गणेश मच्छिंद्र भोसले )

रायगड : इर्शाळ गडाच्या पायथ्याशी ही घटना घडली आहे. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. रायगड जिल्ह्यालाही जोरदार पावसाने झोडपले आहे. खालापुरात काल रात्री गावावर दरड कोसळल्याने या दरडीखाली 60 ते 70 जण दबले आहेत. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून 25 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.काल रात्री 10.30 ते 11 वाजता ही दुर्दैवी घटना घडली.खालापूरच्या इर्शालगडावरील चौक गावापासून 6 किलोमीटर डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासींची वाडी आहे. या वाडीवर रात्री दरड कोसळली. या गावात 40 घरे आहेत. ही सर्व घरे दरडीखाली आली आहेत. रात्री गावातील लोक झोपेत असतानाच ही दरड कोसळली. त्यामुळे 60 ते 70 जण दरडीखाली दबल्या गेली. ही घटना घडताच आजूबाजूच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अग्निशमन दल आणि पोलिसांना तात्काळ पाचारण करण्यात आलं. एनडीआरएफची टीमही घटनास्थळी धाव घेतली.ही दरड कोसळल्यामुळे शेजारीच मोरबे धरण असल्याने आसपासच्या गावात दहशत निर्माण झाली आहे. आता पहाट झाल्याने पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेमची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत रात्रीच घटनास्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments