खरं तर भारतातील भाषिक, जातीय, व धार्मिक रचना पाहिली तर इथे अनेक प्रकारे राहणीमान आणि त्यांची सामाजिक संस्कृती ठेवन पाहायला मिळेल. मागील ऐतिहासिक काळातील कारणे किंवा आढावे घ्याल तर आपल्याला कळेल कीं भारताच्या भूमीत सगळ्यात मोठा धोंडा जातीय आणि धार्मिक संस्कृती चा पाहायला मिळेल आणि त्यातून घडलेले मानवी युद्ध आणि परस्पर द्वेष त्यामुळे आताच्या काळात मानवाच्या जगण्यात अशा अडसर ठरणाऱ्या घडामोडी संपवायच्या असतील आणि भारतातील सर्वभौमत्व टिकवून ठेवायचे असेल तर आपल्याला आपल्यातील म्हणजेच आपल्याच राष्ट्रातील मानमाणसात अडचण ठरणारी वैचारिक कोंडी सर्वप्रथम सोडवावी लागेल. आणि त्यासाठी रोटी -बेटी चे संबंध जोडणे गरजेचे. कारण आपण जोपर्यंत धार्मिक सामाजिक संबंध सुधारू शकत नाहीत आणि त्यामधून उद्भवणाऱ्या अडचणी मतभेद सोडवू शकत नाही तोपर्यंत देश प्रगतीच्या विचारापेक्षा आपल्याच दुही सोडवण्यात व्यस्त राहील आणि बहुतांशी ताकत त्याचं राजकारणात संपत राहील म्हणुन देशहितासाठी आणि काळानुसार मानवी सलोख्य जपण्यासाठी सर्वांनी पुढे येऊन सामाजिक क्रांती साठी रोटी -बेटी चे संबंध जोडून एकमेकाला मानवी बंधनात जोडून, एकमेकांचे विचार समजून घेण्यासाठी आधुनिक पावले टाकणे गरजेचे आहे.तरच तुम्ही
माणूस म्हणुन एकमेकांकडे पहाल अन्यथा धर्माच्या बंधनात बांधलेल्या कठपुतळ्याच समजा!
पॅन्थर तथा पत्रकार मूकनायक राजरत्न जाधव ✍️

