जिल्हाप्रतिनिधी यवतमाळ :चांदू भगवान मोरे
विदर्भ जन आंदोलन आधार संघर्ष समितीची मागणी
रुमने मोर्चाचा दिला इशारा
यवतमाळ – महागांव तहसील ही महाराष्ट्रातील एकमेव तहसील आहे की या तहसीलचा जास्तीत जास्त कार्यकाळ हा प्रभारी तहसिलदारावरच होत आला आहे.यामुळे तहसील अंतर्गत होणार्या अनेक कार्यात बाधा निर्माण होत असून जनतेस नाहक त्रास सहन करावा लागत आहे.या बाबीची दखल घेत विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश उत्तमराव नरवाडे यांनी जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात मुद्देसुद माडून महागांव तहसीलला कायमस्वरूपी तहसिलदार देण्याची मागणी केली आहे.अन्यथा रुमने मोर्चाचा इशारा सुध्दा देण्यात आला आहे.
महागांव तहसील कार्यालयामध्ये निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार विश्वंभर राणे हे यापूर्वी अल्प बचत विभागामध्ये कार्यरत होते.त्यांना तहसील कार्यालयाच्या कामकाजाचा अनुभव कमी असल्याने अशा व्यक्तीवर तहसिलदार पदाचा पदभार दिल्याने जनतेवर अन्याय होत आहे.साध्या प्रकरणाच्या फाईली रेंगाळत पडल्याने तालुक्यातील जनता भिषण वास्तव्यास समोर जात आहे.वास्तविक तहसील कार्यालयामध्ये एम पी एस सी व्दारा थेट नायब तहसीलदार कार्यरत असतांना त्यांचे कडे हा प्रभार देणे अपेक्षित असतांना विश्वाबंर राणे यांना प्रभार देण्यात आला याचे कारण मात्र गुलदस्त्यातच आहे. प्रभारी राणे यांना कामकाजाचा अनुभव नसल्यामुळे व इंग्रजीवर त्यांचे प्रभुत्व नसल्यामुळे विद्यमान न्यायालयाकडून आलेले आदेश दुर्लक्षित केले जात आहेत.
रोजगार हमी योजने सारख्या कायद्याचा अनुभव नसल्यामुळे जि प बांधकाम विभाग व इतर योजनेकडुन तांत्रीक मंजूरात मिळालेल्या प्रकरणामध्ये वि.प्रभारी तहसिलदार प्रशासकीय मान्यता देत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील मजुरांचे शहरी भागाकडे पलयान भरपूर प्रमाणात होत आहे.यावरुन त्यांना रोजगार हमी योजना अर्थातच या कायद्याविषयी अनुभव कमी असल्याचे दिसून पडत आहे.यांना पदावर ठेवणे म्हणजे जनतेवर अन्याय करणे आहे.लहान साहान बाबतीत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागवून त्यातून वेळकाढूपणा करीत आहेत.या पुर्वी कोणत्याही तहसीलदाराने उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शनाकरीता संबंधित लोकांच्या फाईली पाठवील्या नाहीत या वरुन त्यांच्या कार्यप्रणालीत दोष असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वि.राणे साहेबांच्या कार्यकाळात झालेल्या कुळातील जमिनी महसूल अदिवाशी प्रकरणात त्यांनी केलेल्या आदेशाची सखोल चौकशी करण्यात यावी. प्रर्यावरणाला हानिकारक ठरणाऱ्या विटभट्याने महागांव शहराला घातलेला विळखा व कायदेशीर दिलेली परवानगी नियमानुसार नाही त्यामुळे उपजावू शेतकर्यांच्या शेतीतील मातीची दिवसागणित तस्करी होत आहे. यामुळे व्यसनाधीन शेतकरी हा भट्टीमालकाच्या प्रलोभनास बळी पडत आहे.यात दिवसागणित जमिनीची पोत कमी होत असल्याने यातूनच नापिकी होत आहे तर शेतकर्यांना आत्महत्यास सामोर जावे लागत आहे.
ग्राम समृध्दी शेती पांदन रस्ते योजना या योजनेतून आज पर्यंत एकही पांदन रस्त्यास मंजूरात देण्यात आली नाही.या अधिकार्यांमुळे केंद्र व राज्य शासनाची बदनामी होत आहे.अश्या अधिकार्यास तात्काळ हटवून कायमस्वरूपी तहसिलदार देण्यात यावा.
रोजगार हमी योजनेचे तहसिलदार हे कार्यक्षम अधिकारी आहेत. मात्र त्यांना रोजगार हमी योजना या कायद्याविषयी फारसा अनुभव अवगत नसल्यामुळे या योजनेत वैयक्तीक लाभ सोडून कोणतेही काम झालेले नसून याला जबाबदार कोण ? तालुक्यामध्ये शासकीय कामे कुठेही चालु असल्याचे दिसून येत नाहीत त्याला ही हेच प्रभारी तहसिलदार कारणीभूत ठरत आहेत. तसेच प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांचा अनुभव कमी पडत असल्यामुळे अतिरिक्त कर्मचाऱ्यावर त्यांचा वचक राहीलेला दिसून येत नाही. त्यामुळे बळीराजा व जनतेची कामे रेंगाळली आहेत.
कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला असल्यामुळे तालुक्यासह खेड्यापाड्यांना सुद्धा पाणी टंचाई जाणवत असतांना यंत्रणेची साधी बैठक सुध्दा घेतली नसून तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी ठोस पावले या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत उचललेली नाही. निराधार लोकांच्या पगारी देण्यास प्रचंड काळाचा विलंब त्यांचे कार्यकाळात होत असून निराधारांची साधी दखलही घेतली जात नाही.नविन प्रस्ताव मंजूर करण्यास दिरंगाई करीत असल्याचे सुद्धा दिसून येत आहे.
तालुक्यात अवैध गौणखनीज व रेती तस्करी यास यांचाच आशिर्वाद असल्याने दिसुन येत असून चौकशी केल्यास मोठे घबाड उघडकीस येईल. आता पर्यंत अवैध तस्करी विषयी कोणतीही मोठी कार्यवाही स्वतःहुन या अधिकाऱ्याकडून केली गेली नाही असे जनतेच्या लक्षात येत आहे. तसेच लाखो रुपयाच्या दंडाच्या वसूल्या प्रलंबीत आहेत. सदर प्रभारी तहसिलदार राणे यांचे पद त्वरीत काढून कायम ( नियमित ) तहसिलदार देण्यात यावा.अन्यथा विदर्भ जन आंदोलन संघर्ष संघटन च्या वतीने दिनांक २२/०४/२०२२ ला रुमने आंदोलन मोर्चा काढण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
या वेळी विदर्भ जनआंदोलन संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष,जगदीश भाऊ नरवाडे, अमृतराव देशमुख, माजी भाजपा तालुका अध्यक्ष विलास कव्हाणे, सुनील टेमकर, तात्या उर्फ गोविंदराव शिंदे,मधुकर दावजी टेकाळे,लक्ष्मीबाई बंडू पारवेकर, दिलीप सुरोसे, पंजाब राठोड, अदिनाथ चव्हाण,पांडुरंग आडंगे,गजानन पवार, राजाराम पाटे यांनी उपस्थिती दृश्यवून निवेदनात स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

