Thursday, February 26, 2026
Homeनाशिकसंविधान विरोधक सत्तेत येऊन संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेतील -...

संविधान विरोधक सत्तेत येऊन संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेतील – ॲड एस के भंडारे

नाशिक: संविधान समर्थक समाज एकत्र येऊन संविधान विरोधकाला मतदान करू नये नाही तर संविधान विरोधक सत्तेत येऊन संविधानाने दिलेले अधिकार हिरावून घेतील त्यामुळे पुढची पिढी शिक्षण, सरकारी नोकरी पासून वंचित राहतील, सरकारने संविधानाचा अमृत महोत्सव ज्या पद्धतीने साजरा करायला पाहिजे त्याप्रमाणे साजरा केला नाही, महिला या पुरुषापेक्षा शक्तिमान आहेत जसे जिजाई ने शिवराय घडविला, डॉ बाबासाहेब यांच्या मागे माता रमाई खंबीर पने उभ्या होत्या.

महात्मा फुले यांनी शिक्षण सुरू केले आणि मनुस्मृती ही जाळून टाकली पाहिजे असे 25 डिसेंबरला म्हटले होते त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या गुरु महात्मा फुले यांना, सर्वांना शिक्षणाचा संविधानिक अधिकार देऊन आणि 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती जाळून गुरु चा सन्मान केला आहे. आपल्या सर्वांचे बाप म्हणजेच गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या विचाराप्रमाणे काम करणे गरजेचे आहे परंतु आपले बरेच लोक भावनेला बळी पडून पैसे घेऊन विरोधकाला मतदान करतात , त्यासाठी सविधान विरोधकांना मतदान होणार नाही यासाठी काम करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष व समता सैनिक दलाचे स्टाफ ऑफिसर ॲड एस के भंडारे यांनी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया घोटी शहर तालुका इगतपुरी च्या वतीने नालंदा बुद्ध विहाराच्या प्रांगणात आयोजित संविधान समर्थक जोडो अभियान व वर्षावास समारोप दि 15/11/2025 रोजीच्या कार्यक्रमात केले. यावेळी राष्ट्रीय सचिव बी एच गायकवाड गुरुजी महाराष्ट्राचे अध्यक्ष यु जी बोराडे नाशिक पश्चिम जिल्हा शाखाचे सरचिटणीस शरद भोगे नाशिक पश्चिम जिल्हा शाखेचे महिला कार्यकारिणीचे अध्यक्ष सुरेखाताई लोखंडे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष आणि घोटी शहराचे भूमिपुत्र व्ही एम रूपवते यांनी आपले विचार मांडले.

ॲड एस के भंडारे यांनी पुढे असे सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला सक्षमपणे पुढे नेणारा नाशिक जिल्हा असून दादासाहेब गायकवाड यांनी आपल्या गुरु बाबासाहेब आंबेडकर यांना अत्यंत सक्षमपणे साथ दिलेली आहे. त्यांनी म्हणजे नाशिककरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह 5वर्षे चालविला, येवल्याच्या धर्मांतर घोषणाचा कार्यक्रम केला म्हणजे आंबेडकरी चळवळीतील नाशिक हे चळवळीचे एक महत्वाचे केंद्र आहे. कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याने थोडेफार कुरबुरी असणारच परंतु त्या समजूतदारपणाने घेऊन बुद्धाची करुणा मैत्री नुसार काम करून दुसरे संविधान समर्थक जोडणे आवश्यक आहे नाहीतर येणारा काळ पुढच्या पिढीसाठी चांगला नाही. वर्षावास काळात भगवान बुद्धाच्यावेळी चुकीची कबुली देण्यासाठी पात्ती मोख्ख व्हायचा तसा आपणही केलेल्या चुकीबद्दल माफी, सॉरी बोलून आणि मिशन 25नुसार चळवळ मजबूत केली पाहिजे. कार्यकारिणीत 40% तरुणांना संधी द्यावी.

यावेळी नाशिक विभागाचे प्रभारी राज्य संघटक गौरव पवार, जिल्हा कोषाध्यक्ष रितेश गांगुर्डे, वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्ष नीलाताई खरे , नाशिक जिल्हा, पर्य. उपा. प्रकाश जगताप संस्कार सचिव रत्नाकर साळवे, संघटक बाजीराव गायकवाड व , दिडोरी ता., त्र्यंबक ता. नाशिक ता. इगतपुरी तालुका व नाशिक शहर, आणि इगतपुरीच्या आजू बाजूच्या परिसरातील येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी घोटी शहराध्यक्ष गोपाळ दिवेकर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल शिंदे यांनी केले आणि प्रस्ताविक मनोज मोरे यांनी केले , त्रिशरण पंचशील जिल्हा उपाध्यक्ष कृष्णाजी सोनवणे यांनी घेतले. पाहुण्यांचे स्वागत महिला शाखेच्या अध्यक्षा वंदना रूपवते आणि त्यांच्या सहकारी व शहर शाखेचे पदाधिकारी यांनी केले.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments