Thursday, February 26, 2026
HomeUncategorizedमुंबईमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतभर जन आक्रोश आंदोलन

मुंबईमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतभर जन आक्रोश आंदोलन

(शफिक शेख, पिंपरी चिंचवड प्रतीनिधी)

      मुंबई, दि. १६ – महाबोधी महाविहार आंदोलनाचे प्रणेते भंते अनागारिक धम्मपाल व पेरियार स्वामी जयंती आणि भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनानिमित्त आंदोलनाचा टप्पा २ नुसार आता बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या संपूर्ण भारतीय बौद्धांची मातृसंस्था दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा), समता सैनिक दल, बौद्ध महासभा भिक्खु संघ आणि तमाम बुद्ध- आंबेडकर विचार धाराच्या समाज संघटन, संस्था, मंडळे यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १७/९/२०२५ रोजी दुपारी २ वाजता जन आक्रोश आंदोलन मोर्चातील मागण्यांसाठी संपूर्ण देशाच्या राज्य मंत्रालय आणि प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजन केलेले आहे. या तीन मागण्या पुढीलप्रमाणे आहेत.

  1. तथागत भगवान बुद्ध यांना बुद्धत्व  प्राप्तझाले ते युनेस्को ने संरक्षित केलेले  जागतिक बौद्धांचे ठिकाण बोधगया महाबोधी महाविहार हे संपूर्णपणे बुद्धांना नियमन करणे साठीदेण्या ऐवजी बोधगया मंदिर अधिनियम 1949 बिहार सरकार द्वारे 9 सदस्य मध्ये केवळ 4बौद्ध सदस्य असून हा बुद्धगया मंदिर कायदा  संविधानिक अधिकाराचे (अनुच्छेद 25 और 26) उल्लंघन करणारे आहे.बोधगया मंदिर कायदा 1949 हा संपूर्णपणे  संविधान  अनुच्छेद 13 च्या विरोधी आहे . त्यामुळे बौद्धांचे महाबोधी महाविहार चे व्यवस्थापन पूर्णपने बुद्धांना द्यावे आणि त्यामध्ये  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे ट्रस्टी/राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आद.डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना कायम स्वरुपी समाविष्ट करावे.
  2. 2)भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक, त्यांच्या जन्म स्थळ महूमध्ये निर्माण करून, मध्यप्रदेश सरकार ने महान कार्य केले आहे. मात्र या स्मारक चे व्यवस्थापन  बाबासाहेब आंबेडकर यांच्या  विचारधाराच्या विरुद्ध होत आहे.तेथे जयभीम शिवाय अन्य घोषणा दिल्या जात आहेत . त्यामुळे तेथे देश विदेश येथून आलेले लाखो भीम अनुयायी व्यथित होऊन त्यांचा आक्रोश अंतिम क्षणाला पोहचला आहे, त्याचे आंदोलन  महु,  इंदौर तथा देशभरमध्ये चालत आहे.या पार्श्वभूमीवर  मध्यप्रदेश सरकार ने  महु जन्म स्थली के स्मारक चे संपूर्ण व्यवस्थापन समितीच्या घटनेनुसार दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया/डॉ भीमराव य आंबेडकर यांच्याकडे सोपवून भीम अनुयायांना  न्याय देऊन  महामंगल कार्य करावे.
  3. नागपूर दीक्षाभूमी  निर्माण करन्याचे  मुळ शासकीय संमतीपत्र तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया चे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष भय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या नावावर देण्यात आले होते.परंतु नंतर दीक्षाभूमी स्मारक समितीने दीक्षाभूमी वर बेकायदेशीर  कब्जा केला आहे.दीक्षाभूमी वर पार्किंग च्या नावाखाली विद्रूपिकीकरण केले गेले असून त्याच्या विरोधमध्ये संविधान चौक, नागपूर मध्ये भीमसैनिका मार्फत निरंतर आंदोलन चालविले जात आहेत. त्यामुळे दीक्षाभूमी नागपूर चे विद्रूपिकीकरण दूर करून त्याचे व्यवस्थापन बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू  डॉ भीमराव यशवंतराव आंबेडकर )यांच्याकडे देण्याचे कुशल कर्म करावे.

    या तिन्ही विषयामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या राज्य सरकार मार्फत योग्य कार्यवाही करून आमच्या अनूशासनप्रिय समाजाला न्याय प्रदान करून कुशल कर्म करावे, असे निवेदन तीनही राज्यांच्या मुख्यमंत्री आणि देशाच्या राष्ट्रपती महोदया, पंतप्रधान यांना जिल्हाधिकारी मार्फत आणि ईमेल मार्फत देणार आहेत.

      मुंबईमध्ये आझाद मैदान येथे सकाळी 10.30  वाजता मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर व रायगड जिल्ह्याचा एकत्रित आक्रोश मोर्चा केंद्रीय कार्यालय,मुंबई प्रदेश व महाराष्ट्र राज्य शाखेच्या च्यावतीने करण्यात येणार असून त्याचे आयोजन मुंबई प्रदेशने केले आहे. या मोर्च्याचे नेतृत्व डॉ भीमराव य आंबेडकर करणार आहेत  अशी माहिती दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे /समता सैनिक दलाचे केंद्रीय कार्यालय प्रमुख ॲड. एस. के. भंडारे यांनी दिली व त्यांनी सर्वांनी या अस्मितेच्या आंदोलनात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने केले आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments