Thursday, February 26, 2026
Homeनवी मुंबईनवी मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा झाडे कोसळली, सुदैवाने कोणतेच मनुष्यहानी नाही.. शहरी...

नवी मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा झाडे कोसळली, सुदैवाने कोणतेच मनुष्यहानी नाही.. शहरी आपत्ती व्यवस्थापन कार्यशील..

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत रात्री मुसळधार पावसासह जोरदार वाऱ्यांचा तडाखा बसला. विशेषतः नेरूळ, सीवूड्स, आणि वाशी परिसरात पावसाबरोबर वादळाची तीव्रता अधिक जाणवली. या नैसर्गिक प्रकोपामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आणि काही ठिकाणी वाहनांचे नुकसानही झाले.

सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही. नागरिकांनी वेळीच सुरक्षित स्थळी आसरा घेतल्यामुळे संभाव्य धोका टळला.

पालिकेच्या शहरी आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्वरित कारवाई करत रस्ते मोकळे करण्याचे काम हाती घेतले. नागरिकांनी सतर्क राहावे आणि अनावश्यक घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नवी मुंबईतील हवामान विभागाने पुढील काही तासांत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या घडामोडी आणि सुरक्षिततेच्या उपायांसाठी नागरिकांनी पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा हॉट लाईनवर संपर्क साधावा असे नवी मुंबई पालिकेतर्फे आवाहन करण्यात आलेले आहे

- Advertisment -

Most Popular

Recent Comments