Saturday, November 28, 2026
Homeमुंबईसंविधानामुळे मिळालेले अधिकार प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे काम करावे लागेल -डॉ. ऍड. एस....

संविधानामुळे मिळालेले अधिकार प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे काम करावे लागेल -डॉ. ऍड. एस. के. भंडारे

मूकनायक मुंबई प्रतिनिधी.. प्रकाश लांडगे

ठाणे (कल्याण) दि. 26.11.2026.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभी केलेली चळवळ ही केवळ व्यक्तिपूजा, जयजयकार आणि भावनिक घोषणांची चळवळ नव्हती, तर ती समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय आणि मानवी हक्कांची वैचारिक क्रांती होती. ती मागेघेवून जाण्यासाठी समतेचे विरोधक प्रतीक्रांती करत आहेत,

ते आता केंद्र ते राज्य, जिल्हा पर्यंत सत्तेत आहेत. त्यामुळे संविधान कसे बदलायचे/ संपवायचे कट कारस्थान होत आहे, देशात जातीयता, विषमता वाढत आहे. खाजगीकरण, कंत्राटीकरण चालू आहे. शिक्षण खाजगी शिष्यवृत्ती संपविणे चालू आहे त्यासाठी संविधानामुळे अधिकार प्रत्येकापर्यंत पोहचविण्याचे काम करावे लागेल असे प्रतिपादन *डॉ .ऍड.एस. के. भंडारे (ट्रस्टी /केंद्रीय कार्यालय प्रमुख /स्टाफ ऑफिसर समता सैनिक दल)* यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा ठाणे जिल्हा आयोजित भारतीय संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.ऍड भंडारे पुढे असे म्हणाले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये समता प्रस्थापीत व्हावी म्हणून सामानतेच्या दृष्टीकोनातून घडलेल्या पाच घटना म्हणजे महाड चवदार तळे सत्याग्रह, समता सैनिक दलाची स्थापना, मनुस्मृती दहन, बहिष्कृत भारत आणि डॉ बाबासाहेब आमदार झाले

अशा ऐतिहासिक घटनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने दि बुद्धिस्ट सोसायटी आणि समता सैनिक दलाच्यावतीने समता शताब्दी 2027 डॉ.भिमराव यशवंत आंबेडकर (ट्रस्टी /राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा) यांच्या नेतूत्वाखाली मुंबई मध्ये एक लाख सैनिकांचे राष्ट्रीय अधिवेशन घेण्यात येणार असल्याची माहिती दिली व भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून संविधान जागर कार्यक्रम संपूर्ण भारतभर राबविण्याचा निर्णय घेणार.

यावेळी बी एच गायकवाड ( राष्ट्रीय सचिव व केंद्रीय पर्यटन विभाग प्रमुख ), ऍड डॉ एस एस वानखडे ( राष्ट्रीय सचिव व केंद्रीय प्रशिक्षण विभाग प्रमुख ), वसंत पराड ( राष्ट्रीय सचिव ) यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रथम महात्मा ज्योतीराव फुले यांच्या पुतळ्यास आणि 26/11 मध्ये शहिद झालेल्या हेमंत करकरे आणि इतर पोलीसांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दलाने मानवंदना दिली.

सभेच्या सुरवातीस 26/11 मधील शहीदाना श्रद्धांजली व सामूहिक संविधान प्रास्ताविकेची शपथ घेतली. हा कार्यक्रम ठाणे जिल्हा अध्यक्ष विजय ब गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.स्वागत अध्यक्ष शिलाताई तायडे यांनी केले व सूत्रसंचालन छगन सुरवाडे आणि रेशमाताई कांबळे यांनी केले. या संविधान गौरव दिनास जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर,अंबरनाथव मुरबाड तालुका, बदलापूर शहर, डोंबिवली येथील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. प्रशांत प्रकाश गांगुर्डे(कार्यालयीन सचिव ठाणे जिल्हा)

- Advertisment -

Most Popular

Recent Comments