मूकनायक दौंड ता. प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड -फाल्गुन पोर्णिमा (फाल्गुन शुद्ध पौर्णिमा) हा बौद्ध परंपरेत फार उत्सव आहे भगवान गौतम बुद्धांच्या कपिलावस्तु भेटीची संबंधित एक अत्यंत महत्त्वाची दिवस आहे तथागत गौतम बुद्ध ज्ञानप्राप्ती नंतर तथागत गौतम बुद्ध पहिल्यांदा आपल्या गावी परतले तथागत गौतम आपल्या नगरवासीयांना भेटण्यासाठी आणि त्यांना आध्यात्मिक वारसा धम्म देण्यासाठी फाल्गुन पौर्णिमेच्या काळात बाहेरील विहीरांत थांबले होते. आणि त्यांनी कपिलवस्तुतील नागरिकांना व आपल्या परिवारास (राहुल,नंदन, यशोदरा) धम्माचा मार्ग दाखविला म्हणून फाल्गुन पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे फाल्गुन पौर्णिमेचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर व तालुका यांच्या वतीने दौंड शहरांमध्ये आयु.श्रीकांत शिंदे (माजी तहसीलदार तसेच माजी अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर)यांच्या निवासस्थानी माननीय आयु.श्रीकांत साळवे (भारतीय बौद्ध महासभा दौंड शहर अध्यक्ष )यांच्या अध्यक्षतेखाली फाल्गुन पौर्णिमा महोत्सव मोठ्या उल्हासामध्ये संपन्न करण्यात आला.
याप्रसंगी राजगृह बुद्ध विहाराचे अध्यक्ष माननीय आयु.राजेश मंथने तसेच माननीय शिल्पा ताई मंथने आयु.श्रीकृष्ण मोरे (माजी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा) त्याचप्रमाणे आयु.गोपाळ शिंदे (निबंधक अधिकारी) त्याचप्रमाणे आय.भालेराव साहेब ,आयु. श्रीधर बाळकुंदरी तसेच आयु. राजू गायकवाड त्याचप्रमाणे बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होत्या याप्रसंगी वरील सर्वांनी फाल्गुन पौर्णिमेचे महत्व व बौद्ध धम्मा मध्ये त्याचे स्थान याविषयी आपले विचार प्रकट केले याप्रसंगी डॉ. किरण विलासराव जाधव यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण धम्म देसना दिली सदर कार्यक्रमाचे आयोजन व आभार मा. श्रीकांत शिंदे यांनी केले

