मूकनायक रिपोर्टर तानाजी राजवर्धन
कोल्हापूर दि.२५.छत्रपती शाहू महाराजांच्या घराण्याचा विचार वारसा सांगणारे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील माने मल्टीपर्पज हॉलमध्ये आठ महार रेजिमेंटने ३८ वर्षांपूर्वी ‘ऑपरेशन पवन’ अंतर्गत श्रीलंकेमध्ये मेजर रामास्वामी परमेश्वरन यांनी दाखविलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल व त्यागाबद्दल भारत सरकारने त्यांना मरणोप्रांत भारतीय लष्कराचा सर्वोच्च सन्मान ‘परमवीर चक्र’ ने सन्मानित करण्यात आले होते… अडतीस वर्षांपूर्वीच्या त्या लढाईत महार रेजिमेंटच्या वीर सैनिकांनी ‘एलटीटी’ ह्या दहशतवादी संघटनेबरोबर संघर्ष करीत असताना आपल्या प्राणांची आहुती देऊन भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटची परंपरा कायम ठेवून आपले सर्वोच्च बलिदान देऊन आपल्या देशाचे व महार रेजिमेंटचे नावलौकिक केले होते… त्या शूर वीरांना मानवंदना सलामी श्रद्धांजली देऊन युद्धवीर तसेच युद्ध विधवांना सन्मानित करण्यात आले आहें… यां स्मृतीप्रित्यर्थ ‘महार रेजिमेंट’च्या ध्वजास सलामी देऊन त्रिशरण पंचशिल ग्रहण करून यां कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली…हवालदार दिगंबर सादरे यांनी कार्यक्रमांस उपस्थित प्रमुख पाहुणे तसेंच उपस्थित सर्वांचे शब्द सुमणांनी सहर्ष स्वागत केले… कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले ते हवालदार गणपती कांबळे यांनी…संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हवालदार संजय माने यांनी केले, तसेंच ‘परमवीर चक्र दिवसाचा इतिहास’ हा सुभेदार मुकुंद घवे यांनी यथार्थ मांडला…
यां कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कॅप्टन सुनील गोडबोले, माजी सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन किसन बाळस्कर, कॅप्टन किसन बंडलकर, लेफ्टनंट संजय कांबळे, हवालदार गंगाराम वाघमारे इत्यादी सर्वच भारतीय लष्करातील आजी माजी दिग्गज सैनिक उपस्थित होते…
अध्यक्षस्थानी ‘यशसिध्दी आजी माजी सैनिक बहुउद्देशीय वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य’ चे कार्याध्यक्ष कॅप्टन गणपती घोलप हें होते तर उपाध्यक्ष आयु. शिवपुत्र घटकांबळे, हवालदार नाना सकपाळ, अध्यक्ष कॅप्टन सुभाष होनमोरे इत्यादी मान्यवर प्रमुख पाहूणे विचार मंचावर उपस्थित होते…हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हवालदार सदाशिव कांबळे, हवलदार भोपाल वायदंडे, हवलदार पांडुरंग कांबळे, हवलदार दत्तात्रय चिवटे, नायक वसंत धनसरे, नाईक मल्लू चौरे, नाईक मोहन चव्हाण, हवलदार बबन कांबळे, हवलदार मारुती बनसोडे, हवालदार वसंत डावरे, हवलदार संताराम कांबळे, हवालदार सुरेश कांबळे, सुभेदार भीमराव सिद्धनायक यांनी मोलाचे परिश्रम घेतले…तसेंच मोठ्या प्रमाणात माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा सहभाग होता…सर्वांचे सैनिक भोज आयोजित करण्यात आले होते…सुभेदार अजित कांबळे यांच्या आभार प्रदर्शनानंतर ‘महार गाण’ आणि ‘राष्ट्रगीताने’ कार्यक्रमाचे समापन करण्यात आले…

