मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे
दौंड- दिनांक.२ ऑक्टोंबर २०२५ या देशामध्ये पद दलितांना,सामाजिक , शैक्षणिक न्याय हक्क मिळावेत म्हणून विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य समाजाचे असंख्य सभामधून केलेले प्रबोधन,महाड चवदार तळे सत्यागृह,पर्वती,काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह,मनुस्मृतीचे केलेले दहन या सर्व घटना हिंदू मनाचे परिवर्तन करण्यासाठी होते.सर्व प्रयत्न संपल्यावर विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३ ऑक्टोंबर १९३५ सली येवला येथे मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही प्रतीज्ञा केली व त्यानंतर २१ वर्षे सर्व धर्माचा व्यापक अभ्यास करून ५ लाख अनुयायां सह बौद्ध धम्मा ची दीक्षा दिली ऐका अर्थाने विश्व शांतीची ही सुरुवात होती असे विचार ६९ व्यां धम्मचक्र प्रवर्तन दिनी भोईटेनगर येथे व्यक्त केले.नालंदा बुध्द विहार समिती भोइटेनगर येथील कार्यक्रमात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रंती या विषयावर ते बोलत होते.सभेचे अध्यक्ष स्थानी बुध्दी स्ट नालंदा बहुउद्देशीय समिती अध्यक्ष प्र.डॉ.भीमराव मोरे होते.धम्मवंदणा आयु .श्रीधर बाळे कूंद्री यांनी घेतली.सूत्र संचालन विजयकुमार गायकवाड यांनी केले.समुचीत विषयावर डॉ.भीमराव मोरे यांनी विचार मांडले, खीर दान झाले.या दिवशी सरपंच वस्ती येथील संविधान चौकात व राष्ट्र संत गाडगे महाराज चौकातील संविधान स्तभाला हार अर्पण केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास समता सैनीक दलाचे वतीने मानवंदना दिली व धम्मचक्र परिवर्तनाच्य शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमास आयु.गोरख घोडके,आयु.गौतम बेलखेडे म.शिक्षण अधिकारी,आयु.सूर्यकांत जानराव,आयु.बाळू कांबळे,… आयु. सुर्यवशी, आयु. विलास कदम,आयु.विजय कुमार गायकवाड,आयु. किरण मोरे,अड.शीतल मोरे,आयु.सुरभी मोरे,आयु.गालफाडेसर,आयु.श्रीकांत साळवे आयु.जालिंदर सोनवणे आयु.साईनाथ कुलकर्णी इत्यादी मान्यवर हजार होते.

