धाराशिव जिल्ह्यातील कदेर आणि कसगी शाखा उद्घाटन
धाराशिव – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1954 मध्ये दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही स्थापन करून याच संस्थेच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मुक्कामी लाखो अनुयायी बौद्ध धम्म दिक्षा घेवून चातुर्वर्णाची विषमता झुगारून समतेचा बौद्ध धम्म स्वीकारला असून त्या बौद्धांच्या मातृ संस्थेची स्थापना करून आपण खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा गाव खेड्या पर्यंत 24 शिबिरातून येथील मंडळे, बुद्ध विहारे जोडो अभियान राबवून, पदाधिकाऱ्यांनी समंजस पनाने काम करून धम्म पोहचवावा आणि आपले बुद्ध विहार संस्कार केंद्र बनवावे असे प्रतिपादन संस्थेची शाखा जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामधील कदेर आणि कसगी शाखेच्या नाम फलकाचे दिनांक 20/9/2025 रोजी उद्घाटन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी/राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड एस के भंडारे यांनी केले. यावेळी धाराशिव दक्षिण जिल्हा अध्यक्षा राजश्रीताई शांताराम कदम,सरचिटणीस विजय बनसोडे,लोहारा सरचिटणीस दिपक सोनकांबळे,समता सैनिक दलाचे सचिन दिलपाक,अनिल सरतापे,वैभव सिरसाट,नामदेव वाघमारे,विठ्ठल सुरते,संतोष झेंडे,जिल्हा संघटक प्रा सुधिर कांबळे,ब्राह्मनंद गायकवाड, विद्याताई कांबळे,उमरगा तालुका अध्यक्ष अनतकुमार कांबळे,सरचिटणीस संतोष सुरवसे, सोनाली कांबळे, भालेराव सर ,राजेंद्र सूर्यवंशी, बाळासाहेब भोसले, आम्रपाली गोतसुर्वे, रोहिणी बर्वे,इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. या दोन्ही शाखा निर्माण करण्यासाठी जिल्हा संघटक व उमरगा तालुका प्रभारी ब्रह्मानंद गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
ॲड एस के भंडारे यांनी दिनांक 21/9/2025 रोजी तेर गावातील ऐतिहासिक बुद्ध लेणी, चैत्य व पुरातत्व संग्रहालयास भेट दिली व त्याची माहिती घेतली.यावेळी संभाजी कांबळे,शशिकांत सोनवणे, ऍड.कांबळे,अमोल कांबळे,हेमंत मगर यांनी सत्कार केला.
यावेळी धाराशिव येथील डॉ आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब व माता रमाई यांच्या पुतळ्याला आणि उमरगा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.या दोन्ही ठिकाणी अँड एस के भंडारे यांचा समता सैनिक दलाच्या वतीने सत्कार करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ असलेला नळदुर्ग किल्ला हा किल्ला तेराव्या शतकात तयार झालेला असून तो जलदुर्ग, गडदुर्ग, भुईकोट असा सर्वांचे एकत्रीकरण असलेला देशातील एकमेव 126 एकरांचा किल्ला असून त्यातील धबधबा जो एकाच तलावातून आहे परंतु त्यातून एक पाण्याचा प्रवाह हिरवा व दुसरा पांढरा असा होतो असे येथील जयभीम वाघमारे या कर्मचारी गाईड यांनी सांगितली.या ऐतिहासिक स्थळाला सुद्धा भेट दिली.
तसेच भंडारे यांनी जिल्हा पदाधिकारी सह धाराशिव तालुका संघटक एस टी गायकवाड यांच्या अकाली झालेल्या निधनानिमित्त त्यांच्या पुण्यानुमोदन विधीला उपस्थित राहून संस्थेच्या वतीने श्रद्धांजली वाहिली व त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.

