मुकनायक छत्रपती संभाजीनगर, शहर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : देशात बिलिनिअर्सची यादी वाढताना साधनसंपत्तीच्या केंद्रिकरणामुळे विषमता प्रचंड प्रमाणात वाढलीय. देश विकासात प्रतिनिधित्वाच्या धोरणाची अनुकूलता मैलाचा दगड ठरलाय. अनुसूचित जाती-जमातींच्या प्रतिनिधित्वाचे धोरण हे भारतीय लोकशाही आणि संविधानाचे सुरक्षा कवच आहे. म्हणून ते प्रामाणिकपणे राबविण्याची गरज असून सामाजिक न्यायातच महासत्ता भारताचे प्रतिबिंब असल्याचा सूर अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात निघाला.
राजर्षी शाहू महाराज जयंतीदिनी अर्थात सामाजिक न्यायदिनी नागसेनवनातील पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अशोका सभागृहात हे अधिवेशन दोन सत्रात पार पडले. मुंबई पूर्वचे सहायक प्रादेशिक अधिकारी अॅाड. रावसाहेब रगडे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून अधिवेशनाचे उद्घाटन केले. स्वागताध्यक्ष तथा अनुसूचित जाती-जमाती हितकारिणी सभेचे निमंत्रक भास्कर सरोदे यांनी हितकारिणी सभेची ध्येय व उद्दिष्टं सांगितली.
प्रथम सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अभिजित वाडेकर होते. यात वक्तेी रिसर्च स्कॉलर शिवानी वालदेकर, साईचे सहायक संचालक सुमेध तरोडेकर, एजीपी अॅयड. नेहा भीमसेन कांबळे यांनी अनुसूचित जाती-जमातींच्या पुरेशा प्रतिनिधित्वातच उद्याच्या महासत्ता भारताचे प्रतिबिंब दडलेले असल्याचे सांगितले.
दुसर्याे सत्रात शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. पी. एस. कांबळे यांनी स्टेट्स अॅुण्ड मायनॉरिटीज आणि भारतीय संविधानाला देशाचा सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समावेशक विकास अभिप्रेत आहे. तेव्हा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना डावलून सामाजिक न्याय स्थापित करता येणार नसल्याचे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात भीमसेन कांबळे यांनी सामाजिक न्याय स्थापित करण्यासाठी शासकीय आस्थापन व्यवस्थेतून ज्या सेवांमध्ये बाह्यसेवा तथा आऊटसोसिंग : शासन आस्थापना धोरणानुसार शासनाच्या मालमत्ता व वित्तीय सहाय्यातून निविदा, भाडेपट्टा करार, मानधन, लिलाव, गुत्तेदारी, नोंदणी, परवाना द्वारे लोकसेवेतून / लोकसहभागातून शासनाचे सार्वजनिक उपक्रम राबविली जातात. अनुसूचित जाती-जमातींना प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी केली.यात सहसंचालक अनिलकुमार दाबशेड, सामाजिक न्याय व सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन केले. तर प्रा. संदीप गायकवाड यांनी प्रा. डॉ. रमेश सरदार यांचा संदेश वाचताना अनुसूचित जाती-जमातीच्या विकासासाठी राष्ट्रीयकृत बँकेची मागणी केली. आभार अनिलकुमार गायकवाड यांनी मानले.

