भिवंडी -मुकनायक राजरत्न जाधव
बहुजन चळवळीची गायिका दीदी अंजली भारतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या बायकोवर म्हणजेच मिस फडणवीस ह्यांच्यावर केलेल्या आक्षेपर्ह स्टेटमेंट ह्या सरकारच्या निष्काळजी पणाच्या आधारावर परिस्थिती नुरूप होतं. की ज्या माणसाला राज्याची राजकीय ताकत आहे तो व्यक्ती सामाजिक अन्यायाच्या घटनानांवर आदेश तथा कार्यवाही करतांना निष्काळजी पणा करत असेल तर जर त्याच्या घरातल्या व्यक्तीवर जर असा प्रकार घडला तर तुम्हाला काय वेदना होतील हे अंजली भारतीने संतापजनक वाक्यात व्यक्त केलंय.सुप्रसिद्ध गायिका, प्रबोधनकार अंजली भारती ह्यांच्या वाक्यातील “बलात्कार” ह्या शब्दाला माझा विरोध आहेच पण शब्दाला विरोध जरी असला तरीही एक गोष्ट स्पष्ट करतो की जेव्हा राज्यात अनेक महिलांवर शारीरिक शोषण आणि कितीतरी harrasement केसेस होतात, तेव्हा अशा वेळेला महिला आयोगाची प्रमुख रुपाली चाकणकर ह्यांची तसेच वचित्रा वाघ ह्यांची दातखिळी कशी बसली असते तेव्हा अन्यायग्रस्ताना केसेस लढतांना न्यायालयात आपली बाजू मांडताना जो मानसिक त्रास होतो तेव्हा महिला आयोग कोणत्या झोपेत असतं.सरकार मध्ये बसलेल्या मुख्यमंत्र्यांकडून महिला आयोगाकडून दुसऱ्यांच्या महिलाना वेगळा न्याय आणि स्वतःच्या बायकोसाठी वेगळा न्याय… व्वा व्वा आणि जर एवढच जर अंजली भारतीच्या स्टेटमेंट चा राग आला असेल तर महिला आयोग राज्यात घडणाऱ्या महिलांच्या अत्याचारावर गप्प का…?
अंजली भारतीने तुमच्या बेफैली सत्तांध नाकर्ते पणावर विद्रोही संतापजनक प्रतिक्रिया दिलीय. अख्या महाराष्ट्रात सरकारकडून EVM मार्फत लोकशाही वर बलात्कार केला जातो तेव्हा तुमची नैतिकता कुठे असते. मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीसांची बायको जेव्हा वेश्या व्यवसायाला सामाजिक व्यावसायिक प्राधान्य देण्याच्या भाषा करते. तेव्हा ह्या अश्लील पणावर सरकार आणि महिला आयोग कोणता खुटा तोंडात टाकून गप्प बसतं. ड्रुग्स प्रकरणातील माणसे, गुंड,जी समाजाला नव्या पिढीला बरबादीच्या मार्गांवर घेऊन जातात त्यांना तुम्ही पक्ष प्रवेश करवता तेव्हा तुमची पवित्र नैतिकता कुठे जाते…
सोमनाथ सूर्यवंशी ह्याचा मृत्यू पोलीस कस्टडीत झाला तरीसुद्धा मंत्रिमंडळात खोटं बोलून झालेली घटना स्पष्ट वाचाळ शब्दाने दाबुन शाब्दिक बलात्कार करण्याचा प्रयत्न करून आरोपीना साथ देतानाची तुमची नैतिकता कुठे असते. आधीच सत्तेत बसुन जो सामाजिक -राजकीय बलात्कार सत्तेत बसुन लोकशाहीवर करता तेव्हा जनतेप्रति तुमची वैचारिक पवित्रता, नीतिमत्ताकोणता खुटा घालून गप्प बसते.मुख्यमंत्री फडणवीस ह्यांनी आधी आपल्या घराकडे लक्ष द्यावे आणि आपल्या कार्यकर्त्यांना आणि स्वतःला नैतिकता शिकवावी आणि नंतर सामाजिक पवित्रतेची भाषा लोकांना शिकवावी.
🖋️ पॅन्थर पत्रकार राजरत्न जाधव.

