प्रतिनिधी मूकनायक -राजरत्न जाधव
छ.संभाजीनगर – देशात सद्या विश्वापातळीवर चालु असलेला सर्वात महत्वाचा विषय म्हणजे बौद्धगया मुक्ती आंदोलन. हे आंदोलन नसून बौद्ध धम्माच्या भूमिपुत्र भगवान बुद्धाच्या वैचारिक अस्मितेचा प्रश्न आहे जो काळाआड ब्राह्मणी विचारसरणीने काटकरस्थानाने कब्जाने गिळणकृत करण्याचा प्रयत्न केला आहे. ऐतिहासिक बौद्धमय पाऊलखुनानुसार आज ह्या अस्तित्वाला पुन्हा बौद्धसंस्कृतीत समाविष्ट करून घेण्यासाठी देशपातळीवर अनेक विचारवंत, बौद्ध भन्ते,जनसमुदा्यातील कार्यकर्त्यांकडून अहोरात्र आंदोलनात्मक कायदेशीर प्रयत्न केले जात आहेत. त्यातच सध्या छत्रपती संभाजी नगर येथून बौद्धगया मुक्ती आंदोलन कर्ते भन्ते कुलीनपुत्र ह्यांच्या नेतृत्वात तसेच चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन दुमने व सर्व कार्यकर्ते ह्यांच्या सहकार्यात रोजी तारीख 10 डिसेंबर पासून दिल्ली पर्यंत लॉंग मार्च
चालु करण्यात आला आहे. ह्यात सर्व आंबेडकरी बौद्ध बांधव व बुध्दाला मानणारा बहुजन समाजातील जेष्ठ तरुण तरुणी ह्या आंदोलनात सहभागी होऊन ह्या लढ्याची ताकत वाढवत आहेत.बुद्धीला शरणं जाणाऱ्या भगवान बुद्धाच्या परिवर्तनवादी उपदेशाला अनुसरून सर्व समुदाय “बुद्धम शरणम गच्छामी” ह्या पवित्र उपदेशाला वाणीने उच्चारीत पुढे पुढे सरकत आहे. तसेच कार्यकर्ते उत्तमराव सोनावणे, निलेश पट्टेकर, प्रवीण जमधाडे, इंजि.दीपक गायतीलक ह्या सर्वांनी भिक्कू संघाला आरोग्य किट दान देण्यात आले
✍️

