Monday, October 19, 2026
Homeमहाराष्ट्रठाण्याचा आंबेडकरी चळवळीचा वाघ हरपला!

ठाण्याचा आंबेडकरी चळवळीचा वाघ हरपला!

महाराष्ट्र /ठाणे मूकनायक प्रतिनिधी राजरत्न जाधव- आंबेडकरी सामाजिक चळवळीतील झुंजार लढवय्या नेतृत्व, कर्मवीर सुनील दादा खांबे यांचे सोमवार, दिनांक १९ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांनी के.ई.एम. हॉस्पिटल, मुंबई येथे प्रकृती खालावल्याने दुःखद निधन झाले.

त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात शोककळा पसरली आहे. वंचित, दलीत,शोषित, पीडितांच्या हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष करणारा, न्यायासाठी रस्त्यावर उतरणारा खरा लढवय्या आज आपल्यातून निघून गेला.

सुनील भाऊ खांबे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामाजिक न्याय, समता आणि बंधुत्वाच्या विचारांसाठी काम केले.

तसेच त्यांनी नुकताच Ambedkaraight अलायन्स च्या मार्फत संघर्षमय सामाजिक कार्य चालू केले होते, त्यांचे विचार आणि सामाजिक योगदान कधीही विसरले जाणार नाही. सामाजिक चळवळीची ही कधीही भरून न निघणारी हानी आहे. ठाण्यातील बेधडक झुंजार नेतृत्व म्हणून त्यांची
ओळख होती.
बसपा, रिपाइं, आंबेडकरी अलायन्स सारख्या आंबेडकरी संघटन चळवळीमधून त्यांनी आपला बहुतांशी राजकीय- सामाजिक प्रवास करत ठाण्यात आंबेडकरी चळवळीला लढाऊ पद्धतीने पुढे नेऊन एक वेगळी ओळख निर्माण करण्याचे काम त्यांनी केले.
नुकताच विधानसभा निवडणुकीच्या वेळी लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या EVM मशीन च्या विरोधात केलेले ठाण्यातील मतदान केंद्रावरील बुथवर केलेले विद्रोही शाहीफेक आंदोलन आज सुद्धा जनतेच्या लक्षात आहे.
त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीत शोककळा पसरली आहे. त्यांचे कार्य हे चळवळीसाठी विस्मरणीय राहील. आंबेडकरी चळवळीच्या लढवय्या वाघाला अखेरचा जय भिम जय शिवराय त्यांच्या ज्वलंत स्मृतींना मूकनायक परिवारातर्फे भावपुर्ण आदरांजली.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments