Thursday, February 26, 2026
HomeUncategorizedहिमालयाची सावली

हिमालयाची सावली

आई रमाई सावली , होती हिमालयाची लागू दिली नाही झळा , आम्हा तिने उन्हाची

नेता खरा तो भीमबा , इथल्या मुक्या जगाचा होती रमा अर्धांगिनी , त्या मूकनायकाची

आम्हा विहारा सारखे , घरही रमाभिमाचे देई जगाला साक्ष ही , ते राजगृह याची

हृदयी रमाईच्या वसे , करुणामयी निळाई आदर्श आई ती रमा , कोटी निळ्या पिलांची

आई रमा हे नांव ही , घे विश्व आदराने ती शोभली धम्मांगिनी , एका युगंधराची

नसते मिळाले जर अम्हा , बा भीम अन् रमाई करतो ‘अशोका’ कल्पना , कुठल्या भयंकराची

: अशोक बुरबुरे , हिंगणघाट

- Advertisment -

Most Popular

Recent Comments