वसमत: प्रतिनिधी आळणे मिलिंद
छत्रपती संभाजी नगर, हॉटेल रेड वेलवेट,सूतगिरणी चौक येथे मैत्री कट्टा कवी मनाचा आयोजित चौथे राज्यस्तरीय एकदिवसीय कवी संमेलन अतिशय उत्साहामध्ये पार पडले. या साहित्य संमेलनाचे आयोजन प्रसिद्ध साहित्यिका,कवयित्री, शिक्षिका श्रीम.अल्का साखरे – धोंडणे मॅडम (संस्थापिका मैत्री कट्टा कवी मनाचा) तसेच मा.विजय दळवी (हास्य कवी),मा.अर्जुन गायकवाड (प्रसिद्ध कवी) व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.या कार्यक्रमासाठी संमेलनाध्यक्षा मा.श्रीमती आशा डांगे मॅडम(शिक्षिका,प्रसिद्ध कवयित्री),उद्घाटक – श्रीमती नीता श्रीश्रीमाळ मॅडम (उपशिक्षणाधिकारी), मा.श्रीमती विद्या दीक्षित मॅडम(शिक्षण विस्तार अधिकारी )मा.अनिल साखरे सर( मुख्याध्यापक), प्रमुख पाहुणे- मा.विजय पांचाळ सर (प्रसिद्ध कवी,निवेदक ),मा.गिरीश जोशी सर(गझलकार),मा.संदीप खाडे सर(कवी, लेखक) या साहित्य संमेलनासाठी उपस्थितहोते.मान्यवरांच्या हस्ते माता सावित्रीच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने संमेलनास सुरुवात करण्यात आली. या साहित्य सोहळ्याचे उत्कृष्ट सूत्रसंचालन मा. समाधान लोणकर व मा. सचिन वालतुरे यांनी केले. साहित्य सोहळ्याला सुरुवात करण्याअगोदर महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना उपस्थित सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ना चिट्ठी ना कोई संदेश या गीताचे बोल सादर करून समाधान लोणकर यांनी दादांना श्रद्धांजली वाहिली. कवी संमेलनात कवी,कवयित्रींच्या सादरीकरणाला प्रतिसाद देताना पहाडी आवाजात शेरोशायऱ्या,दमदार चारोळ्या आणि गीतांचे बोल सादर करून समाधान लोणकर यांनी उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. संमेलन अध्यक्षा श्रीमती आशा डांगे मॅडम व इतर प्रमुख मान्यवरांनी समाधान लोणकर यांच्या सूत्रसंचालनाचे कौतुक व अभिनंदन करत सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा विचारमंचावर सन्मान केला. साहित्य क्षेत्रामध्ये सुप्रसिद्ध कवी,निवेदक म्हणून समाधान लोणकर यांच्या नावाची व कवितांची दखल घेण्यात येत आहे. साहित्य क्षेत्राबरोबरच व्याख्यानाच्या माध्यमातून महामानवांचे सकारात्मक विचार समाजात पेरण्याचे कार्य मा.समाधान लोणकर करत असल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

