मूकनायक/अमोल भालेराव.
नाशिक जिल्हा प्रतिनिधी.
आझाद समाज पार्टीच्या वरखेडा येथील नवीन शाखेचे उद्घाटन युवा नेतृत्व साहिल सोनवणे, नाशिक जिल्हाध्यक्ष,यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.या कार्यक्रमाला दिंडोरी तालुक्यातील कार्यकर्ते,पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर पक्षध्वज पूजनाने करण्यात झाले.यानंतर युवा नेतृत्व जिल्हाध्यक्ष साहिल सोनवणे यांनी शाखेचे फीत कापून उद्घाटन केले. उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी पक्षाची भूमिका,आगामी योजना,आणि युवकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. “सामाजिक न्याय, समानता आणि विकास हीच पक्षाची भूमिका असून गावपातळीवर युवकांचे संघटन बळकट करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” त्यासाठी “गाव तेथे शाखा” असा उपक्रम सुरू केला असल्याचे त्यांनी सांगितले,पुढे आपल्या भाषणात ते म्हणाले. कुठेही अन्याय अत्याचार झाल्यास भीम आर्मी आझाद समाज पार्टी त्या विरुद्ध पूर्ण ताकदीने मैदानात उतरून अन्यायग्रस्त व्यक्तीला जाती धर्माच्या पलीकडे जाऊन न्याय मिळवून देण्याचे कार्य करेन
यावेळी वरखेडा येथील स्थानिक पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली.नवीन शाखेमुळे परिसरात भिम आर्मी आझाद समाज पार्टी पक्षाची संघटनात्मक ताकद वाढेल,असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.आझाद समाज पार्टी युवकांच्या रोजगारासाठी लढणार असल्याचे यावेळी साहिल सोनवणे यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून समारोप करण्यात आला.यावेळी परमोरी व लखमापूर फाटा या शाखेंचे उद्घाटन संपन्न झाले.शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमास उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मुकेश गांगुर्डे,प्रशांत मोरे,पँथर रविराज सोनवणे,माजी सरपंच वर्षाताई रविराज सोनवणे,
दिंडोरी तालुका अध्यक्ष वैभवभाई शार्दूल व उपाअध्यक्ष अजित बर्डे तालुका कार्यअध्यक्ष स्वप्नील गांगुर्डे तालुका संघटक तुषार साळवे तालुका सपंर्क प्रमुख फैजान मनियार तालुका सचिव कृष्णा जगताप तालुका प्रसिद्ध प्रमुख कीशोर शेळके वणी शहर अध्यक्ष प्रफुल केदारे तालुका सचिव तीरुपती गांगुर्डे वरखेडा शाखा अध्यक्ष संतोष निकम,दत्तु कडाळे,रोहित डंबाळे ओम गांगुर्डे,राहुल गागुर्डे,मुन्ना गांगुर्डे,क्रिश पवार,कुंदन गांगुर्डे, लखमापुर फाटा अध्यक्ष प्रज्वल गांगुर्डे विवेक बागुल विवेक पवार विजय सोनवाने समाधान सोनवाने सिध्दार्थ सोनवने मनोज कावळे राकेश साळवे आधि उपस्थित होते.

