Thursday, February 26, 2026
Homeनाशिकराजकिय दबावामुळे वणीत सट्टा - मटका सह अवैद्य व्यवसायांना मोकळे रान ?

राजकिय दबावामुळे वणीत सट्टा – मटका सह अवैद्य व्यवसायांना मोकळे रान ?

मूकनायक/ अमोल भालेराव.

नाशिक जिल्हा प्रतिनिधी/
वणी पोलिस ठाणे हद्दीत अवैद्य व्यवसायांना सध्या सुगीचे दिवस आले आहे.प्रतिबंधित असलेला गुटखा तस्करी व विक्री परिसरात बिनबोभाट पणे सुरू असतानांच त्यात अवैध सट्टा – मटका,जुगार सुरू झाल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कार्यशैलिवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.एकीकडे शासन सामान्य महीलांचा आर्थिक स्थर कसा उंचावेल या साठी प्रयत्न करत असतांना त्याच लाडक्या बहिणींच्या कुंकवाला अर्थात दाजींना अशा व्यसनांच्या आहारी लाऊन त्यांना कोण देशोधडीला लावत आहे.याचा शोध आता जनतेनेच घेणे क्रमप्राप्त झाले आहे.दिवसभर मोल मजुरी काबाडकष्ट करून आलेले पैसे संसाराला न लावता अशा व्यसनांमध्ये जात असल्याने परिसरात महिला वर्ग पुरता हैराण झालेला बघावयास मिळत आहे.परिसरात बनावट दारू विक्रीचा महापूर,गुटखा तस्करी,आणि सट्टा – मटका,जुगार बिनबोभाट पणे सुरू आहेत.नेमका या सर्वांना वरदहस्त कुणाचा आहे हे शोधण्याची वेळ वणीकरांवर आली आहे.नव्यानेच वणी पोलिस ठाण्यात रुजू होताच महिला पोलिस अधिकारी गायत्री जाधव यांनी अवैद्य दारू विक्री करणारांची धरपकड सुरू करत पोलिसी खाक्या दाखवला होता. तशा बातम्या वृत्तवाहिन्यांवर प्रसिद्ध झाल्यानंतर परिसरात महिला वर्गाने समाधान व्यक्त केले होते.सपोनी गायत्री जाधव या पोलिस दलात कडक शिस्तीच्या अधिकारी म्हणून परिचित आहेत.मात्र त्यांच्यावर राजकीय दबाव निर्माण करून परिसरात अवैध व्यवसाय सुरू झालेच कसे ? संबंधित कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी हा राजकीय दबाव झुगारून लावतील काय..? हा प्रश्न येणारा काळच सांगेल.तो पर्यंत महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळात असे अवैध व्यवसाय सुरु असल्याचे नागरिकांना उघड्या डोळ्यांनी बघण्याखेरीच व परिसरातील गोरगरीब,कष्टकरी,शेतमजूर,व सर्वसामान्य लाडक्या बहिंनींना डोक्याला हात लावत अश्रू गाळण्या पलीकडे पर्याय सध्यातरी दिसत नाही.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments