Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड नगरपरिषद व ठेकेदाराकडून पिण्याच्या पाण्यासाठी निकृष्ट दर्जाची पाईपलाईन (नागरिकांचे आरोग्य धोक्यात)

दौंड नगरपरिषद व ठेकेदाराकडून पिण्याच्या पाण्यासाठी निकृष्ट दर्जाची पाईपलाईन (नागरिकांचे आरोग्य धोक्यात)

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधी विजय बगाडे

दौंड : दौंड नगरपरिषद हद्दीत यादव वस्ती व स्प्रिंग हील अपार्टमेंट मागील बाजूस बारामती पाटस हायवे रोडच्या कडेला शेतकी फार्म जवळील सुमारे २०० ते २५० मीटर अंतरावरील नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याने यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये असे गंभीर आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे नगरपरिषद प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत आहे तसेच अनेक वर्ष पासून या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या होती तेथील नागरिकांना दोन-तीन किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्यासाठी जावे लागते असल्याने अनेक वेळा दौंड नगरपरिषद प्रशासनाला अनेक वेळा निवेदन देऊन आत कुठेतरी नगरपरिषद जाग आली तेव्हा या भागात काम चालू झाले असताना निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम केले आहे.

संबंधित ठेकेदार व नगरपरिषद पाणीपुरवठा अधिकाऱ्यांच्या, पाणी पुरवठा सभापती व मुख्याधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नगरपरिषद व ठेकेदारांच्या संगनमताने करण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाचे पाईपलाईन कामाबाबत गंभीर आरोप होऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही सदर कामासाठी निधी मंजूर करण्यात आला असताना प्रत्यक्षात अत्यंत हलक्या दर्जाची पाईप वापरण्यात आल्याची प्राथमिक पाहणीतच स्पष्ट झाले आहे शासनाच्या निकषांनुसार असणाऱ्या दर्जेदर साहित्य ऐवजी कमी किमतीची निकृष्ट व दर्जाहीन साहित्य वापरून मोठ्या प्रमाणा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments