Thursday, February 26, 2026
Homeदौंडत्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती विश्वशांती बुद्धविहार पाटस येथे उत्साहात साजरी

त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर जयंती विश्वशांती बुद्धविहार पाटस येथे उत्साहात साजरी

मूकनायक दौंड तालुका प्रतिनिधीविजय बगाडे

कोण म्हणतो. तू सात कोटीची मायकोण म्हणतो. तू नऊ कोटीची मायमी म्हणतो. तू सगळ्यांची माय मला दाखवा, एखादा भारतीय ज्याच्यावर माझ्या माता रमाई माय चे उपकार नाहीरमाई म्हणजे कठोर कर्तव्य निष्ठेचे मूर्तीमंत प्रतीक माता रमाई म्हणजे आदर्श गृहिणी व कर्तव्य दक्ष. माता रमाई म्हणजे त्याग, संघर्ष, कर्तव्य, जाणीव आणि सदगुणांची खाण आपण माता रमाई माय ची जयंती दिन साजरा करताना माता रमाई मायचे गुण अंगीकार करून आपल्या जीवनात उपयोगी करणे, म्हणजेच माता रमाई माय जयंती करणे होयजयंतीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन

दौंड-दिनांक ७ फेब्रुवारीत्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची जयंती भारतीय बौद्ध महासभा, दौंड तालुका यांच्या वतीने विश्वशांती बुद्धविहार, पाटस येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ( पत्रकार ) जयदीप बगाडे यांनी भूषविले.कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अध्यक्ष जयदीप बगाडे यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माचे महत्व विशद केले. धम्म केवळ स्वीकारण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याचा प्रचार व प्रसार समाजाच्या तळागाळापर्यंत कसा पोहोचवावा, यावर त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व धम्म चळवळीत दिलेली मोलाची साथ ही इतिहासातील प्रेरणादायी घटना असल्याचे त्यांनी नमूद केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही रमाबाई आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या कार्यामागे खंबीरपणे उभे राहून त्याग, सहनशीलता आणि समर्पणाचा आदर्श समाजासमोर ठेवला, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा, दौंड तालुका यांच्या सामाजिक, धार्मिक व प्रबोधनात्मक कार्याचे अध्यक्षांनी विशेष कौतुक केले. अशा कार्यक्रमांमधून समाजात धम्ममूल्यांची जपणूक होऊन नवी पिढी योग्य दिशेने घडते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास उपस्थित.आयुष्यमान दत्तात्रेय कोकाटे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका, जयदीप बगाडे पत्रकार, पिंटू डाळिंबे जिल्हा पुणे पूर्व संघटक, श्रीकांत साळवे संघटक दौंड तालुका हजर होते. आप्पा सोनबा मोरे संरक्षण उपाध्यक्ष, गायकवाड चंद्रकांत सचिव, सिद्धार्थ भालेराव कार्यालयीन सचिव, सोनवणे कार्यकर्ते हजर होते श्रीकांत शिंदे माजी दौंड शहर अध्यक्ष, कांबळे सर ऑडिटर, कांबळे सर संस्कार उपाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम शांतता, एकोपा आणि धम्ममय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका अध्यक्ष दत्तात्रय कोकाटे यांनी केले. आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले

- Advertisment -

Most Popular

Recent Comments