भिवंडी(मुकनायक ) राजरत्न जाधव
ठाणे : भिवंडी तालुक्यातील दुगाड फाटा ग्रामपंचायत हद्दीत भिवंडी -वाडा या महामार्गावर महाळुंगे गावचा रहिवासी जयेश सुर्वे या 37 वर्षीय युवकाचा महार्गावरून येणाऱ्या कंटेनरच्या जोरदार धडकेत जागीच मृत्यू झाला.सदरील युवक आपल्या वयक्तिक कामासाठी महामार्गाच्या किनाऱ्यावर थांबला असतांना मागून येणाऱ्या मालवहू कंटेनर कडून जोरदार धडकेमुळे युवक खाली कोसळून डोक्याच्या भागात जोरदार आघातामुळे जागीच मृत्यू झाला .पोलीस प्रशासना कडून तातडीने सदर घटना स्थळी धाव घेत माहिती घेऊन सदर कंटेनर चालक ह्यास ताब्यात घेऊन अपघाती गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ह्या घटनेमुळे स्थानिक लोकांत अपघाताविषयी हळहळ व्यक्त केली जात आहेह्या घडलेल्या अपघातसंदर्भात पुढील तपासणी पोलीस प्रशासन करीत आहेत.

